एक्स्प्लोर

Parineeti Chopra Raghav Chadha : आकर्षक रोषणाईने सजलं परिणीतीचं मुंबईतलं घर; उद्या दिल्लीत राघव चड्ढा यांच्यासोबत होणार साखरपुडा

Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार असून 13 मे 2023 रोजी त्यांचा साखरपुडा होणार आहे.

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : 'लेडीज वर्सेस रिकी बहल'च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 13 मे ला (उद्या) परिणीती आणि राघव यांचा दिल्लीत साखरपुडा होणार आहे. दरम्यान परिणीतीचं मुंबईतलं घरदेखील आकर्षक रोषणाईने सजलं आहे. 

आकर्षक रोषणाईने सजलं परीचं घर

परिणीतीच्या आलिशान घराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीतीच्या घरी साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात झाल्याची पाहायला मिळत आहे. आकर्षक रोषणाईने नवरीबाईंचं घर सजलं आहे. परिणीतीचं हे घर मुंबईतील वांद्रे येथील आहे. या घरच्या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत परिणीतीला शुभेच्छा देत आहेत. 

साखरपुड्याला परिणीतीचे डिझायनर आउटफिट (Parineeti Chopra Engagement Outfit)

मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती साखरपुड्यात मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाइन केलेले आउटफिट परिधान करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी परिणीती मनीष मल्होत्राच्या घराबाहेर स्पॉट झाली होती. परिणीतीचा साखरपुड्यातील लूक आलिया-कतरिनापेक्षा हटके असणार आहे. परिणीतीसाठी खास सुंदर नक्षीकाम केल्याचा लेहेंगा डिझाईन केल्याचं म्हटलं जात आहे. 

परिणीती आणि राघव रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटला स्पॉट करण्यात आलं आहे. अनेक मुंबई आणि दिल्ली विमानतळावरदेखील दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच आयपीएल पाहण्यासाठी दोघेही स्टेडिअमध्ये गेले होते. आता परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार राघव-परिणीती यांचा साखरपुडा!

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच काही निवडक राजकारणी मंडळी आणि सेलिब्रिटीदेखील या साखरपुड्याला हजेरी लावणार आहेत. फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा होणार आहे. 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नसोहळ्यासाठी चाहते उत्सुक आहेत. साखरपुडा अवघ्या एक दिवसावर आला असला तरी दोघांनीही अद्याप त्यांच्या रिलेशनबद्दल भाष्य केलेलं नाही. 

संबंधित बातम्या

Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती-राघवची लगीनघाई! फक्त 150 पाहुण्यांच्या उपस्थितीत नवी-दिल्लीत होणार साखरपुडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget