Parineeti Chopra Pregnant : दीपिका पदुकोणनंतर आणखी एका अभिनेत्रीकडे गुड न्यूज? सहा महिन्यांपूर्वीच बांधलीय लग्नगाठ
Parineeti Chopra : सहा महिन्यापूर्वीच या अभिनेत्रीचा विवाह झाला. सध्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत असून ती गरोदर असल्याची चर्चा सुरू आहे.
Parineeti Chopra : बॉलिवूडमध्ये सध्या विवाहसोहळे जोरात सुरू आहेत. तर, दुसरीकडे काही सेलेब्स आई-बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका-रणवीर सिंहने (Deepika Padukone Ranveer Singh) आईबाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री गुड न्यूज देणार असल्याची चर्चा आहे. सहा महिन्यापूर्वीच या अभिनेत्रीचा विवाह झाला. सध्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत असून ती गरोदर असल्याची चर्चा सुरू आहे.
बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली परिणीती चोप्राकडे (Parineeti Chopra) 'गुड न्यूज' असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये परिणीतीने आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. या पॉवरफुल जोडप्याच्या लग्नाची खूप चर्चा झाली. लग्नानंतर परिणीती अनेकदा राधवसोबत तिचे फोटो शेअर करत असते. आता परिणीती चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच परिणीतीच्या प्रेग्नेंसीची अटकळ बांधली जात आहे.
View this post on Instagram
परिणीती चोप्रा गरोदर आहे?
परिणीती चोप्रा नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी पॅपाराजींनी परिणीतीला कॅमेऱ्यात कैद केले. परिणीतीचा व्हिडीओ समोर येताच लोकांनी तिच्या गुड न्यूजबाबत कमेंट्स केल्या आहेत. परिणीतीने व्हाईट कलरचा लूज शर्ट आणि शॉट्स परिधान केला आहे. तिचा हा लूक पाहून लोकांनी ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
युजर्सने 'गुड न्यूज'वर विचारला प्रश्न
परिणीती चोप्राचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर युजर्सच्या प्रतिक्रिया सातत्याने समोर येत आहेत. यावर कमेंट करताना बहुतांश युजर्सनी परिणीती प्रेग्नंट असल्याचे सांगितले. कमेंट करताना एका युजरने गुड न्यूज असल्याचे सांगितले. तर, दुसऱ्या युजरने ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले. एकाने तर गुड न्यूजची घोषणा करा असे म्हटले.