Bollywood Actors : कधीकाळी गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचा 'हा' अभिनेता, आज अमाप संपत्तीचा मालक आहे हा अभिनेता
Bollywood Actors : बॉलीवूडच्या या दिग्गज अभिनेत्याने एकदा फक्त तीन दिवसांत बँकेची नोकरी सोडली. मग हा अभिनेता त्याच्या गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचा.
Bollywood Actors : प्रत्येक कलाकाराने त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना करत यशाची शिखरं गाठलेली असतात. बॉलिवुडमध्ये (Bollywood) अशा अनेक मंडळींनी आयुष्यात असा काळ पाहिला आहे. असाच एक दिग्गज बॉलिवुड अभिनेत्याने त्याची बँकेतली नोकरी तीनच दिवसांत सोडली आणि अभिनयाची वाट धरली. पण त्या काळात या अभिनेत्याला त्याच्या गर्लफ्रेंडकडून पैसे मागण्याची वेळ आली होती.
हा अभिनेता राष्ट्रीय पुरस्कार विजेता असून त्याने आतापर्यंत 240 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2014 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले होते. खरंतर हा अभिनेता दुसरा कोणी नसून परेश रावल आहेत. परेश रावल हे बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी आहेत, पण त्यांना इथवर पोहचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे.
तीन दिवसांतच सोडली होती बँकेची नोकरी
परेश रावल यांचा जन्म 30 मे 1955 रोजी मुंबई एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईतील विलेपार्ले येथील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले. कॉलेज संपल्यानंतर परेश लवकरात लवकर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याने बँकेत नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये कामही केलं, पण तीनच दिवसांत ती नोकरी सोडली.
गर्लफ्रेंडकडून घ्यायचे पैसे
दरम्यान त्यानंतर परेश रावल हे त्यांच्या गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचे. त्यांची गर्लफ्रेंड, अभिनेत्री आणि मिस इंडिया 1979 ची विजेती स्वरूप संपत ही परेश रावल यांची गर्लफ्रेंड होती. त्यानंतर त्यांनी 1987 मध्ये तिच्याशी लग्न केलं आणि त्यांना आदित्य-अनिरुद्ध ही दोन मुलं झालीत.
परेश रावल नेटवर्थ
रिपोर्ट्सनुसार, परेश रावल एका चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपये घेतात. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 93 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे, अभिनयाव्यतिरिक्त, कलाकार जाहिरात, मॉडेलिंग आणि इतर अनेक स्त्रोतांमधून कमाई करतात.
कॉमिक भूमिकांमुळे मिळाली प्रसिद्धी
2000 मध्ये, परेश रावल यांनी प्रियदर्शनच्या हेरा फेरीमध्ये बाबूराव गणपतराव आपटे या महाराष्ट्रीय गॅरेज मालकाची भूमिका साकारली होती. बाबुरावच्या भूमिकेतील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.