(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Panchayat 3 : 'पंचायत'चा सीझन 3 रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांकडून मोठी घोषणा, उत्सुकता शिगेला पोहोचली
Panchayat Season 4 : 'पंचायत 3'चा (Panchayat 3) या सीरिजच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक आहेत. अशातच आता या सीरिजबाबतीत निर्मात्यांनी मोठी अपडेट दिली आहे.
Panchayat Season 4 : 'पंचायत' (Panchayat 3) या बहुप्रतीक्षित वेबसीरिजचा तिसरा सीझन रिलीज होण्यास आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे 'पंचायत 3' सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही कॉमेडी, ड्रामा सीरिज 28 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. सध्या सोशल मीडियावरही ही सीरिज ट्रेडिंगमध्ये आहे. अशातच आता निर्मात्यांनी तिसरा सीझन रिलीज होण्याआधी काही खुलासे केले आहेत. 'पंचायत 3'मधील कलाकारांचा अंदाज चाहत्यांना हैराण करेल, असे म्हटले जात आहे. अशातच आता निर्मात्यांनी 'पंचायत 4'बद्दल मोठी अपडेट दिली आहे. पुढील सीझनवर काम सुरू झाल्याचं ते म्हणाले आहेत.
'पंचायत 4'बद्दल निर्मात्यांकडून मोठी घोषणा
दीपक मिश्रा यांनी 'पंचायत'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आता पीटीआईला दिलेल्या मुलाखतीत दीपक मिश्रा म्हणाले,"पंचायत 4'च्या संहितेवर काम सुरू आहे. तिसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. त्यामुळे आता आम्ही चौथ्या सीझनवर काम सुरू केलं आहे. आम्ही या शोचे तीन ते चार एपिसोड लिहिलेले आहेत. 'पंचायत 4' बाबतीत आमच्या आयडिया क्लिअर आहेत". पंचायतचे पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतील, असं दिग्दर्शकाचं मत आहे. 2020 मध्ये या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर दुसरा भाग 2023 मध्ये आला होता. आता अवघ्या काही तासांत तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
View this post on Instagram
काय आहे 'पंचायत'ची गोष्ट?
'पंचायत' या वेबसीरिजची कथा अभिषेक कुमार त्रिपाठी या पात्राभोवती फिरणारी आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिषेकला फुलेरा गावात सचिव म्हणून नोकरी मिळते. 20 हजार रुपयांचा पगार मिळत असल्याने तो हैराण होतो. सचिवाला गावात राहत असताना गावकरी आवडू लागतात आणि तो त्यांच्या समस्येचे निवारण करतो.
जितेंद्र कुमारने केली सचिव जी अन् शाहरुख खानची तुलना
जितेंद्र कुमारने काही दिवसांपूर्वी पंचायतमधील सचिव जीची तुलना स्वदेश चित्रपटातील मोहन भार्गवसोबत केली होती. सचिव जी च्या पात्रात स्वदेशमधील शाहरुख खानची झलक मिळते असं त्याचं मत होतं. गावात राहायला त्याला काहीही अडचण नाही. पुढे तो याच गावाचा भाग होतो".
संंबंधित बातम्या