Pan Masala Ad : पान मसाला जाहिरातीचा वाद संपेना! अमिताभ बच्चन, रणवीर, अजय आणि शाहरुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल
Pan Masala Ad : याचिकेत असा आरोप केला आहे की, या अभिनेत्यांच्या तंबाखू उत्पादनांशी संबंधित जाहिराती लोकांना तंबाखूचे सेवन करण्यास प्रोत्साहित करत आहेत.
Pan Masala Ad : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या विरोधात बिहारच्या मुझफ्फरपूर येथील न्यायालयात गुरुवारी एक याचिका दाखल करण्यात आली असून, त्यात ते गुटखा आणि तंबाखूच्या वापरास प्रोत्साहन देतात, असा आरोप करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी हे याचिका दाखल केली आहे. त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की, या अभिनेत्यांच्या तंबाखू उत्पादनांशी संबंधित जाहिराती लोकांना तंबाखूचे सेवन करण्यास प्रोत्साहित करत आहेत.
तमन्ना हाश्मी यांनी अभिनेता रणवीर सिंहच्या नावाचाही या याचिकेत समावेश केला आहे. गुटखा आणि पान मसाला जाहिरातींमध्ये दिसण्यास सहमती देऊन, ते आपल्या आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा गैरवापर करतात असे यात म्हटले गेले एआहे. हाश्मी यांनी आपल्या याचिकेत, भारतीय दंड संहितेच्या कलम 311, 420, 467 आणि 468 अंतर्गत कलाकारांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी केली आहे. या मागणीनुसार कलाकारांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘या’ कलाकारांनी आधीच मागितली माफी!
अलीकडेच पान मसाला आणि गुटख्याच्या जाहिरातीवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत एका पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसला होता. त्याचवेळी दुसऱ्या एका जाहिरातीत तो तंबाखूला विरोध करताना दिसत आहे. यावरून वाद वाढल्यावर अक्षयला माफी मागावी लागली होती.
अशीच एक जाहीरात केल्याबद्दल ‘महानायक’ अमिताभ बच्चन देखील ट्रोल झाले होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वाढदिवशी एक निवेदन जारी केले होते की, त्यांनी या जाहिरातीसोबतचा त्यांचा करार संपुष्टात आणला आहे. ‘कमला पसंत’च्या जाहिरातीनंतर काही दिवसांनी कंपनीशी बोलून त्यांनी जाहिरातीसोबतचा करार संपुष्टात आणला आणि प्रमोशनची फीही परत केल्याचे म्हटले होते.
हेही वाचा :
- Cannes Film Festival 2022 : अमृता फडणवीसांची 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी; ट्विटरवर शेअर केला फोटो
- Kon Honaar Crorepati : ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ रंगणार! 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व होणार सुरू
- Dharmaveer : पहिल्याच आठवड्यात 'धर्मवीर'ने केली 13.87 कोटींची कमाई; प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद कायम