Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Panchayat Season 3 Trailer : सचिवजींचे कमबॅक, फुलेरा गावात निवडणुकीची रणधुमाळी; पंचायत-3 चा ट्रेलर लाँच
Panchayat Season 3 Trailer : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज असलेल्या पंचायत -3 चा (Panchayat 3) ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या दोन सीझन प्रमाणे पंचायतचा तिसरा सीझनही धमाल असणार आहे. फुलेरा गावच्या सचिवजींची बदली रद्द करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे आता फुलेरा गावात नव्या सरपंचाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. आता या गावच्या राजकारणात काय होणार, सचिवजी काय करणार, आमदार काय करणार? हे सगळे पंचायत-3 मध्ये दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल; नेटकरी म्हणाले,"पब्लिसिटी स्टंट"
Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) प्रकृती खालावल्याने सध्या चर्चेत आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपल्या विनोदी अंदाजाने आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखीला 'बिग बॉस'ची (Bigg Boss) आई असं म्हटलं जातं. पण राखीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राखी सावंत हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. राखी सावंतला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणते चित्रपट अन् वेबसीरिज रिलीज होणार...
OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. रुपेरी पडदा, टेलिव्हिजन आणि युट्यूबपेक्षा ओटीटीवर कंटेंटचा भडीमार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज झाले. या आठवड्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एस एस राजामौलींच्या 'बाहुबली द क्राउन ऑफ ब्लड'सह अनेक शो आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. ओटीटीवर या आठवड्यात हॉलिवूड ते साऊथपर्यंत अनेक कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. थरारा, नाट्य, विनोद, अॅक्शन अशा विविध जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Chandu Champion Kartik Aaryan : कार्तिक आयर्नचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; 'चंदू चॅम्पियन'चा फर्स्ट लूक लाँच
Chandu Champion First Look Kartik Aaryan : कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. शूटिंग सुरू झाल्यापासून ते रॅपअपपर्यंत आणि त्यानंतर रिलीज डेटपासून ट्रेलरपर्यंत प्रत्येक माहिती टीम शेअर करत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटातील कार्तिकचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. चंदू चॅम्पियनमधील भूमिकेसाठी कार्तिक आर्यनने जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Zeenat Aman : एकेकाळी दिवसाला असंख्य सिगारेट ओढले; पण आयुष्यात आलेल्या त्या गोष्टीने पुन्हा कधीच केला नाही स्पर्श
Zeenat Aman : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) सध्या चर्चेत आहे. सिगारेट ओढण्यामुळे अभिनेत्री आता चर्चेत आली आहे. सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानीकारक आहे. पण श्रीमंत व्यक्तीपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच सिगारेट ओढायला आवडतं. बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांना सिगारेट ओढण्याचा शौक आहे. बॉलिवूडची एक अभिनेत्री दिवसाला असंख्य सिगारेट पीत असे. पण एकदिवस अभिनेत्रीच्या आयुष्यात असा काही आनंद आला की त्यानंतर तिने कधीही सिगारेटला स्पर्श केला नाही. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचं नाव झीनत अमान आहे.