Panchayat Season 3 Trailer : बहुप्रतिक्षीत वेब सीरिज असलेल्या पंचायत -3 चा (Panchayat 3) ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या दोन सीझन प्रमाणे पंचायतचा तिसरा सीझनही धमाल असणार आहे.  फुलेरा गावच्या सचिवजींची बदली रद्द करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे  आता फुलेरा गावात नव्या सरपंचाच्या निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. आता या गावच्या राजकारणात काय होणार, सचिवजी काय करणार, आमदार काय करणार? हे सगळे पंचायत-3 मध्ये दिसणार आहे. 


'पंचायत 3' चा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. गावाकडील राजकारणात सचिवजी आणि रिंकी यांच्यात जवळीक आणि फ्लर्टींग दिसणार आहे. रिंकी आणि सचिवजी यांची केमिस्ट्री या सीझनमध्ये दिसणार आहे.  दुसऱ्या सीझनमध्ये सुरू झालेली त्यांच्यातील मैत्री आता प्रेमात रुपांतरीत होईल का, याची उत्सुकता प्रेक्षकांना असणार आहे.


पंचायत-3 च्या ट्रेलरमध्ये काय?


ट्रेलरची सुरुवात सचिवजींच्या गावात परतण्याने होते. बदली रद्द होऊन अभिषेक त्रिपाठी फुलेरा गावात परतला आहे. सचिवजी देखील गावच्या राजकारणाचा हिस्सा होणार नाही ना अशी शंका बनकरसच्या मनात उपस्थित होते. याला निमित्त ठरते ते केंद्र सरकारची आवास योजना. त्यावरून आता गावातील राजकारणाला फोडणी मिळणार आहे. 


पंचायतच्या या सीझनमध्ये बनरकस वेगळाच डाव खेळणार आहे. त्याला आमदाराचा पाठिंबा असून प्रधानजींचा (सरपंच) पराभव करून सत्ताबदल करायचा आहे. या साऱ्या खेळातून सचिवजी आणि प्रधानजी यांचे कुटुंब कसे बाहेर पडते, फुलेरात काय धमाल होणार हे  या सीझनमध्ये दिसून येईल. 






 


कधी होणार रिलीज? 


पंचायत-3  हा 28 मे रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. नीना गुप्ता, जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. त्याचा ट्रेलर 17 मे रोजी रिलीज होणार होता. पण दोन दिवस आधीच ट्रेलर रिलीज करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देण्यात आला आहे. 


पाहा पंचायत-3 चा ट्रेलर - Panchayat Season 3 - Official Trailer | Jitendra Kumar, Neena Gupta, Raghubir Yadav | May 28




इतर संंबंधित बातम्या: