OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर दर आठवड्यात अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असतात. रुपेरी पडदा, टेलिव्हिजन आणि युट्यूबपेक्षा ओटीटीवर कंटेंटचा भडीमार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक धमाकेदार चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज झाले. या आठवड्यातही ओटीटीवर प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. एस एस राजामौलींच्या 'बाहुबली द क्राउन ऑफ ब्लड'सह अनेक शो आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. ओटीटीवर या आठवड्यात हॉलिवूड ते साऊथपर्यंत अनेक कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. थरारा, नाट्य, विनोद, अॅक्शन अशा विविध जॉनरच्या कलाकृती या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.
एथले मेडिसन (Ashley Madison)कुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्सकधी रिलीज होणार? 15 मे 2024
एथले मेडिसन ही नेटफ्लिक्सची सीरिज सत्य कथा मांडण्याचा प्रयत्न करते. लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवणाऱ्या लोकांसाठी बनवलेली ही साईट हॅक होते. त्यामुळे लाखो लोकांची वैयक्तिक माहिती लीक होते. नेटफ्लिक्सवर प्रेक्षक 15 मे 2024 रोजी ही सीरिज पाहू शकतात.
मॅडम वेब (Madame Web) कुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्सकधी रिलीज होणार? 16 मे 2024
मार्वल कॉमिक्सच्या पात्रांवर आतापर्यंत जेवढे चित्रपट रिलीज झाले ते सगळे सुपरहिट ठरले आहेत. 'मॅडम वेब'देखील मार्वल कॉमिक्सचा कंटेंट आहे. डकोटा जॉनसन स्टारर हा चित्रपट एका महिला वैज्ञानिकेवर आधारित आहे. नेटफ्लिक्सवर 16 मे 2024 रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे.
मॉन्स्टर (Monster) कुठे रिलीज होणार? नेटफ्लिक्सकधी रिलीज होणार? 16 मे 2024
मॉन्स्टर ही नेटफ्लिक्सची आगामी सीरिज आहे. या सीरिजमधअये थरार आणि रहस्य असं दोन्ही दाखवण्यात आलं आहे. ही इंडोनेशियन सीरिज आहे. एक मुलगी राक्षसाचा सामना करते. त्यानंतर पुढे काय घडतं हे या सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. 16 मे 2024 पासून प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येईल.
क्रॅश (Crash)कुठे रिलीज होणार? डिज्नी प्लस हॉटस्टारकधी रिलीज होणार? 13 मे 2024
थरार, नाट्य आणि विनोद आणि अॅक्शन या सर्व गोष्टी एकाच कलाकृतीत पाहायच्या असतील तर क्रॅश नक्की पाहा. 13 मे 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा शो सुरू आहे.
कलवान (Kalvan) कुठे पाहता येईल? हॉटस्टारकधी रिलीज होणार? 14 मे 2024
'कलवान' हा साऊथ शो आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना थ्रिल आणि नाट्य पाहायला मिळेल. कलवान हॉटस्टारवर प्रेक्षक 14 मे 2024 पासून पाहू शकतात.
क्वीन(Qween) कधी रिलीज होणार? 15 मे 2024कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
'क्वीन' ही सीरिज 15 मे 2024 पासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सॉल स्विमर यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. म्यूझिक रॉक बँड आर्टिस्टचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.
बाहुबली : क्राउन ऑफ ब्लड (Bahubali: Crown of Blood)कधी रिलीज होणार? 17 मे 2024कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
एसएस राजामौलींचा बाहुबली हा चित्रपट प्रेक्षकांना आता अॅनिमेशन सीरिजच्या स्वरुपात पाहता येणार आहे. 17 मे 2024 रोजी ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
जरा हटके जरा बचके (Zara Hatke Zara Bachke) कधी रिलीज होणार? 17 मे 2024कुठे पाहता येईल? जिओ सिनेमा
'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात विकी कौशल आणइ सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. सिनेमागृहात धमाका केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आता 17 मे 2024 पासून जिओ सिनेमावर पाहता येणार आहे.
गॉजिला एक्स कॉन्ग: द न्यू अम्पायर (Godzilla X kong : The New Empire)
मेटावर्स फ्रेंचायझीचा पाचवा चित्रपट गॉजिला एक्स कॉन्ग: द न्यू अम्पायर अमेरिकन मॉन्स्टर चित्रपट आहे. रेबेका हॉल, ब्रयान ट्री, डॅन स्टीवन्स स्टारर हा चित्रपट 13 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे.
बस्तर: द नक्सल स्टोरी (Bastar: The Nexal Story)कधी रिलीज होणार? 17 मे 2024कुठे पाहता येईल? झी5
अदा शर्मा स्टारर 'बस्तर: द नक्सल स्टोरी'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट झी5 वर प्रेक्षकांना 17 मे 2024 पासून पाहता येईल.
संबंधित बातम्या