Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) प्रकृती खालावल्याने सध्या चर्चेत आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आपल्या विनोदी अंदाजाने आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. राखीला 'बिग बॉस'ची (Bigg Boss) आई असं म्हटलं जातं. पण राखीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राखी सावंत हृदयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. राखी सावंतला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


राखी सावंत 'या' कारणाने रुग्णलयात दाखल


पापराझी विरल भयानीने राखी सावंतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे,"राखी सावंतला हृदयाच्या आजारामुळे लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता राखीच्या हेल्थ अपडेटबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. राखी सावंतच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. आता तिचा क्रेझीनेस पाहण्याची उत्सुकता आहे". राखीच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तर काही नेटकरी याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. 






राखी सावंत हृदयाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे तिला मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राखी सावंतचे रुग्णालयातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात राखी सावंत बेडवर झोपलेली दिसून येत आहे. काही फोटोंमध्ये तिच्या हातावर सलाईन लावलेलं दिसत आहे. एका फोटोमध्ये नर्स तिचं बीपी चेक करताना दिसत आहे.


राखीच्या आजारावर नेटकऱ्यांचा विश्वास बसेना


राखी सावंतने अनेकदा लोकांना फसवलं आहे. त्यामुळे आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यावर नेटकऱ्यांचा विश्वासच बसत नाही आहे. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. देवा रुग्णालयातील लोकांना हिंमत दे, ती कशीही असली तरी देवा कोणाला रुग्णलयाची पायरी चढायला देऊ नको, राखीवर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे, ओव्हर अॅक्टिंगचे साईट इफेक्ट्स, लवकर ठीक हो, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. राखीस सावंतच्या टीमने याबद्दल काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant : अटकेपासून बचाव करण्यासाठी राखी सावंतची सर्वोच्च न्यायालयात धाव; प्रकरण नेमकं काय?