Lok Sabha Election 2024 : 'लोकसभा निवडणूक 2024' (Lok Sabha Election 2024) च्या दृष्टीने सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना त्यांची मालमत्ता जाहीर केली आहे. बॉलिवूड आणि भोजपुरी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी यंदा निवडणूक लढवणार आहेत. यात कंगना रनौत (Kangana Ranaut), हेमा मालिनी (Hema Malini) ते पवन सिंहपर्यंत (Pawan Singh) अनेक कलाकारांचा समावेश आहे. या सेलिब्रिटींनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीदेखील उमेदवारी अर्ज भरताना आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे. यावरुन कंगना रनौत, हेमा मालिनी आणि पवन सिंह यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त कॅश आहे हे स्पष्ट होतं. जाणून घ्या कोणाकडे किती संपत्ती आहे...
कंगना रनौतकडे किती संपत्ती आहे?
कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडीमधून निवडणूक लढवणार आहे. अभिनेत्रीने नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एफिडेविटमध्ये आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानुसार, कंगना रनौतकडे 91.50 कोटी रुपयांची संपत्ती आहे. कंगना रनौतकडे मुंबईत 7 आणि मंडीमध्ये एक, असे एकूण आठ बँक अकाउंट आहेत. यात एकूण 2 कोटी 55 लाख 86 हजार 468 रुपये आहेत. आयडीबीआय बँकेत अभिनेत्रीत दोन अकाऊंट आहेत. यातील एका अकाऊंटमध्ये एक कोटी सात लाख आणि दुसऱ्यात 22 लाख आहेत. बँग ऑफ बडोदामध्येही कंगनाचं अकाऊंट आहे. यात 15,189,49 रुपये डिपोझिट आहे. मुंबईतील HSBC बँकमध्ये कंगना रनौतचे 1,08,844,01 रुपये आणि स्टँडर्ड चार्टेड अकाउंटमध्ये 1,55,504 रुपये जमा आहेत. ICICI बँकमध्ये अभिनेत्रीचे दोन अकाऊंट आहेत. यातील एका अकाऊंटमध्ये 26,619 रुपये आणि दुसऱ्यात 50 हजार रुपये जमा आहेत. कंगना रनौतकडे 3 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने, 5 कोटी सोनं आणि 50 लाख चांदी आहे. कंगनाकडे दोन लाख रुपये कॅश आणि 53 हजार रुपयांची वेस्पा स्कूटर आहे. कंगना रनौतवर 17.38 कोटी रुपयांचं कर्ज आहे.
हेमा मालिनीकडे किती संपत्ती?
अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी (Hema Malini) उत्तर प्रदेशातील मथुरामधून लोकसभा निवडणूक लढवत आहे. हेमा मालिनीकडे 3 कोटी 39 लाख, 39 हजार 307 रुपयांचे दागिने आहेत. तर तिचे पती धर्मेंद्र यांच्याकडे 1 कोटी 75 लाख 8 हजार 200 चे दागिने आहेत. हेमा मालिनी यांचे बँकेत 12 कोटी 98 लाख 2 हजार 951 रुपये आहेत. तर धर्मेंद्र यांच्याकडे 17 कोटी 15 लाख 61 हजार 453 रुपयांची संपत्ती आहे. हेमा मालिनी यांच्यातडे 18 लाख 52 हजार 865 रुपयांची कॅश आहे. तर धर्मेंद्र यांच्याकडे 43 लाख 19 हजार 16 रुपयांची आहे. हेमा मालिनी यांच्याकडे 1 कोटी, 42 लाख, 21 हजार, 695 रुपयांचं कर्ज आहे. तर धर्मेंद्रवर 49 लाख 67 हजार 42 रुपयांचं कर्ज आहे. हेमा मालिनीकडे 1 अरब 13 कोटी 60 लाख 51 हजार 610 रुपयांची वेगवेगळी प्रॉपर्टी आहे. तर तिचे पती धर्मेंद्रकडे 1 अरब 36 कोटी 7 लाख 66 हजार 813 रुपयांचा बंगला आहे.
पवन सिंहकडे किती संपत्ती आहे?
भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार पवन सिंहदेखील निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी जाहीर करताना अभिनेत्याने आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. पवन सिंहची एकूण संपत्ती 10 कोटी 31 लाख 38 हजार 840 रुपये आहे. पवन सिंहकडे 60 हजार रुपयांची कॅश आहे. भोजपुरी स्टारकडे 31 लाख 4 हजार रुपयांचे दागिने आहेत. त्याच्याकडे 66 लाख 39 हार 428 रुपयांचा इंश्योरेंस आहे. तसेच त्याच्याकडे 1 कोटी रुपयांचं कर्ज आहे. पवन सिंहचं मुंबई आणि लखनौत घर आहे. याची किंमत 6.5 कोटी रुपये आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांनी वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 52 हजार रुपयांची कॅश आहे. पंतप्रधानांचे दोन बँक खाते आहेत. गुजरातमधील बँक खात्यात 73 हजार 304 रुपये जमा आहेत. तर वाराणसीच्या खात्यात फक्त सात हजार आहेत. एसबीआयमध्येच नरेंद्र मोदी यांची 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची एफडी आहे. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. याची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. त्यांची एकूण संपत्ती 3 कोटी 2 लाख 6 हजार 889 रुपये आहे.
संबंधित बातम्या