एक्स्प्लोर

OTT Release This Week : 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; जाणून घ्या कोणते चित्रपट अन् वेबसीरिज रिलीज होणार...

OTT Release This Week : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होणार आहेत. या कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

OTT Release This Week : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर मे (May) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक धमाकेदार चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. या कलाकृतींची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ओटीटीवर दर आठवड्यात विविध धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत असतात. येत्या आठवड्यातही प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. नेटफ्लिक्स (Netflix), प्राईम व्हिडीओ (Prime Video), हॉटस्टार (Disney Plus Hotstar), सोनी लिव्ह (Sony Liv), झी 5 (Zee 5), जिओ सिनेमा (Jio Cinema) अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत आहेत. यात हीरामंडी (Heeramandi), सिटाडेल : हनी बनी (Citadel), शैतानसह (Shaitaan) अनेक कलाकृतींचा समावेश आहे.

हीरामंडी : द डायमंड बाजार (Heeramandi : The Diamond Bazaar)
कधी रिलीज होणार? 1 मे 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

'हीरामंडी : द डायमंड बाजार' ही बहुचर्चित वेबसीरिज 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. संजय लीला भन्साळीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, शेखर सुमन, फरदीन अध्यन सुमन हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 

द ब्रोकन न्यूज सीझन 2 (The Broken News Season 2)
कधी रिलीज होणार? 3 मे 2024
कुठे पाहता येईल? झी 5

'द ब्रोकन न्यूज'चा पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. या बहुचर्चित सीरिजमध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रेया पिळगांवकर मुख्य भूमिकेत आहेत. 'द ब्रोकन न्यूज 2'मध्ये अमीना कुरैशी, दीपांकर सान्याल आणि राधा भार्वग संघर्ष करताना दिसून येणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना 3 मे 2024 रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 

वीमेन ऑफ माय बिलियन (Women of My Billion)
कधी रिलीज होणार? 3 मे 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

'वीमेन ऑफ माय बिलियन' हा माहितीपट 3 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. एका महिलेची गोष्ट या माहितीपटात दाखवण्यात आली आहे. कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंतचा पायी प्रवास करत ही महिला आपला प्रवास पूर्ण करते. 

मंजुम्मेल बॉईज (Manjummel Boys)
कधी रिलीज होणार? 5 मे 2024
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार

'मंजूम्मेल बॉईज' हा मल्याळम चित्रपट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता 5 मे 2024 रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. मल्याळमसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

शैतान (Shaitaan)
कधी रिलीज होणार? 3 मे 2024
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स

अजय देवगन आणि आर.माधवन यांच्या 'शैतान' या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सिनेमागृहानंतर ओटीटीवर चित्रपट रिलीज होण्यास सज्ज आहे. एका कुटुंबाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 3 मे 2024 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

द आयडीया ऑफ यू (The Idea of You)
कधी रिलीज होणार? 2 मे 2024
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ

'द आयडीया ऑफ यू' हा रोमँटिक विनोदी चित्रपट आहे. 2 मे 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट रिलीज होत आहे. 

संबंधित बातम्या

OTT May Release : संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी' ते समंथाची 'सिटाडेल'; 'मे' महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार धमाकेदार वेबसीरिज अन् चित्रपट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिलीTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
उज्ज्वल निकम अन् बाळासाहेब कोल्हेंना पाहून वाल्मिक कराडचा मोठा निर्णय, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी वकील बदलला, नवा वकील कोण?
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
रितेशनं प्रीती झिंटाचा हात हातात घेतला अन् किस केलं; जिनेलियाचे हावभाव टिपणारा VIDEO व्हायरल, म्हणाली...
Donald Trump on India : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, टॅक्स कमी करण्यासाठी भारताची सहमती, आता भारताकडून तत्काळ खुलासा
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार; मढी ग्रामसभेच्या 'त्या' ठरावाला न्यायालयाची स्थगिती
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
बलुच बंडखोरांकडून पाकिस्तानात रेल्वे हायजॅक; लष्कराच्या कारवाईत 30 सैनिक, 16 बंडखोर ठार; 214 ओलिसांपैकी 104 जणांची सुटका
'नो स्मोकिंग डे' का साजरा करतात?
'नो स्मोकिंग डे' का साजरा करतात?
Dharashiv Crime : धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
धाराशिवमध्ये संतोष देशमुख प्रकरणासारखीच संतापजनक घटना, 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड, काठीनं अमानुष मारहाण, मृत समजून विवस्त्र अवस्थेत दिलं फेकून
Embed widget