(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OTT : पाकिस्तानी प्रेक्षकांना आजही बॉलिवूडची भूरळ! 'या' वेबसीरिज आणि चित्रपटांनी लावलंय वेड
OTT Web Series : पाकिस्तानातील (Pakistan) प्रेक्षक आजही आवडीने भारतीय वेबसीरिज पाहतात. नेटफ्लिक्सच्या काही भारतीय सीरिजने पाकिस्तानी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
OTT Web Series : भारतात प्रत्येक जॉनरचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) निर्मिती होते. प्रत्येक विषयावर कलाकृती बनवायला भारतातील लेखक, दिग्दर्शकांना आवडतं. यामुळे भारतीय चित्रपट आणि वेबसीरिज फक्त देशातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. नेटफ्लिक्सवर सध्या भारतीय चित्रपट आणि वेबसीरिज प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहेत. या चित्रपटांना आणि वेबसीरिजला जगभरातील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानमध्येही या सीरिज आणि चित्रपट आवडीने पाहिल्या जात आहेत. जाणून ध्या नेटफ्लिक्सवरील 'टॉप 10' चित्रपट आणि वेबसीरिजबद्दल...
नेटफ्लिक्सच्या 'या' कलाकृतींचा पाकिस्तानात ट्रेंड (Netflix TOP 10 in Pakistan)
1.) लापता लेडीज (Laapataa Ladies)
किरण राव आणि आमिर खान प्रोडक्शन हाऊसबॅनरअंतर्गत बनलेला 'लापता लेडीज' हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा खूपच दमदार आहे. या चित्रपटात गावातील लग्न आणि तेथील लोकांच्या मानसिकतेवर भाष्य करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील प्रेक्षकांना हा चित्रपट आवडत आहे.
2.) शैतान (Shaitaan)
अजय देवगन आणि माधवन अभिनीत 'शैतान' हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात सुपरनॅचरल थ्रिलर कथानक दाखवण्यात आलं आहे. एक कुटुंब या चित्रपटात क्रेंद्रस्थानी आहे. विकास बहलने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
3.) अमर सिंह चमकीला (Amar Singh Chamkila)
पंजाबचा पहिला रॉकस्टार अमर सिंह चमकीलाच्या आयुष्यावर आधारित 'अमर सिंह चमकीला' हा चित्रपट आहे. 12 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. अमर सिंह चमकीलाची पाकिस्तानमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.
4.) दंगे (Dange)
'दंगे' या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शन आणि नाट्य पाहायला मिळेल. अहान भट्ट आणि हर्षवर्धन राणे अभिनीत हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी रिलीज झाला. दंगे हा चित्रपट पाकिस्तानातील सिनेप्रेमी आवडीने पाहत आहेत.
5.) आर्टिकल 370 (Article 370)
'आर्टिकल 370' हा चित्रपट एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यानंतर 19 एप्रिल 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. नेटफ्लिक्सवरील या चित्रपटाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. यामी गौतमीचा दमदार अभिनयही चाहत्यांना भावला आहे. 'आर्टिकल 370' पाकिस्तानमध्येही पाहिला जात आहे.
6.) डंकी (Dunky)
शाहरुख खानच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये 'डंकी'चादेखील समावेश आहे. अवैध्य पद्धतीने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणाऱ्या माणसाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारी 2024 रोजी ओटीटीवर स्ट्रीम होईल. डंकी पाकिस्तानमध्येही पाहिला जात आहे.
7.) अॅनिमल (Animal)
अल्फा मेन्सच्या गोष्टीवर आधारित 'अॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अॅनिमलला पाकिस्तानाची प्रेक्षकांचंही प्रेम मिळत आहे.
8.) 12 वीं फेल (12th Fail)
'12 वीं फेल' या चित्रपटाची कथा आयपीएस मनोज शर्मा (Manoj Sharma) याच्या आयुष्यावर आधारित आहे. आपल्या शेजारच्या देशात हा चित्रपट मोठ्या संख्येने पाहिला जात आहे.
9.) हीरामंडी (Heeramandi)
संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेबसीरिजचा भारतात जलवा आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानमध्येही हीरामंडी सीरिज आवडीने पाहिली जात आहे.
10.) मामला लीगल है (Maamla Legal Hai)
रवी किशन आणि यशपाल शर्मासारख्या कलाकारांनी सजलेली 'मामला लीगल है' ही वेबसीरिज आहे. या विनोदी सीरिजमध्ये कोर्टरुमचं एक वेगळं जग दाखवण्यात आलं आहे. पाकिस्तानमध्ये या सीरिजची चांगलीच क्रेझ आहे.
संबंधित बातम्या