Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर'ने भारतात पार केला 100 कोटींचा टप्पा; जगभरात केली 3970 कोटींची कमाई
Oppenheimer Movie : 'ओपनहायमर' या सिनेमाने भारतात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर' (Oppenheimer) हा हॉलिवूड सिनेमा सध्या चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. भारतीय सिने-रसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा सिनेमा पाहायला जात आहेत. 'ओपनहायमर' या सिनेमाने भारतात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'ओपनहायमर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Oppenheimer Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटनुसार,'ओपनहायमर' या सिनेमाने भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला (Opening Day) 14.5 कोटींची दणदणीत कमाई केली. पहिल्या आठवड्यात 73.2 कोटी, दुसरा आठवडा 29.5 कोटींचा गल्ला जमवला. एकंदरीत भारतात आतापर्यंत रिलीजच्या 17 दिवसांत या सिनेमाने 114.73 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 3970 कोटींची कमाई केली आहे.
'ओपनहायमर' खास का आहे?
'ओपनहायमर' या हॉलिवूडपटाच्या दिग्दर्शनाची धुरा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनने (Christopher Nolan) सांभाळली आहे. अभिनेता सिलियन मर्फीने (Cillian Murphy) या सिनेमात अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहाइमर (J Robert Oppenheimer) यांची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
'ओपेनहाइमर' हा सिनेमा अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे रॉबर्ट ओपेनहाइमर यांचं काम रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अणुबॉम्बचा शोध लावण्याचे श्रेय रॉबर्ट यांना जातं. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. जगभरातील सिनेप्रेमींच्या हा सिनेमा पसंतीस उतरला आहे.
रॉबर्ट ओपेनहायमर कोण आहेत? (Who Is J. Robert Oppenheimer)
दुसऱ्या महायुद्धात वापरल्या गेलेल्या अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक रॉबर्ट ओपेनहायमर. ज्यू वंशाचे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. आण्विक शस्त्रास्त्रे विकसित करण्याचे उद्दिष्ट असलेल्या मॅनहटन प्रकल्पाचे ते प्रमुख होते. रॉबर्ट ओपेनहायमर यांच्यावर भगवद्गीतेचा मोठा प्रभाव होता. 16 जुलै 1945 मध्ये अणुबॉम्बची चाचणी यशस्वी झाल्यानंतर रॉबर्ट ओपेनहायमर यांना भगवद्गीते मधील एका श्लोकाचा अर्थ डोक्यात आला. 'now i am become death the destroyer of worlds' आणि त्यांचा तो व्हिडीओ आजही खूप व्हायरल आहे. त्यांना भगवद्गीतेचे भाषांतर वाचायचे नव्हतं म्हणून त्यांनी खास संस्कृत शिकले असं म्हणतात आणि त्यानंतर रॉबर्ट यांनी या काळात बरेच भगवद्गीतेचे दाखले दिल्याचं समजतं.
संबंधित बातम्या