OMG 2: सेन्सॉर बॉर्डाने 'ओएमजी-2' पाठवला रिव्ह्यू कमिटीकडे; चित्रपटातील 'या' सीनवर नेटकऱ्यांकडून टीका
'ओएमजी-2' (OMG 2) हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण रिलीज होण्याच्या आधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
OMG 2: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओएमजी-2' (OMG 2) या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरचं काही जणांनी कौतुक केलं तर काही नेटकऱ्यानी या टीझरवर टीका केली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण रिलीज होण्याच्या आधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'ओएमजी-2' या चित्रपटाच्या एका सीनवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच हा चित्रपट आता सेन्सॉर बॉर्डाने रिव्ह्यू कमिटीकडे पाठवला आहे.
रिपोर्टनुसार, सेन्सॉर बॉर्डाने सर्टिफिकेट देण्याआधी हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवला आहे. असं म्हटलं जात आहे की, सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही डायलॉग्स आणि सीन्सवर आक्षेप घेतला आहे. रिव्ह्यू कमिटीच्या रिव्ह्यूनंतर हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परत पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असं म्हटलं जात आहे.
'या' सीनवर नेटकऱ्यांकडून टीका
'ओएमजी-2' या चित्रपटाच्या टीझरमधील एका सीनमध्ये दिसले की, रेल्वेच्या पाण्यानं अक्षयचा अभिषेक केला जात आहे. या सीनवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एका नेटकऱ्यानं 'ओएमजी-2' चित्रपटामधील अक्षयच्या या सीनचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर करुन लिहिलं, जर चित्रपटात अक्षय कुमार हा भगवान शिव यांची भूमिका साकारत असेल तर कृपया चित्रपटातून हा सीन काढून टाका. महादेवाला रेल्वेच्या या पाण्याने जलाभिषेक करताना दाखवले आहे, हे हिंदूंच्या श्रद्धेशी खेळण्यासारखे आहे.'
So @akshaykumar is using drainage water, dirty water from the train to do the “abhishek” of Mahadev in #OMG2Teaser
— काली🚩 (@SRKsVampire_) July 11, 2023
This Canadian deserves all the insults he gets. No wonder why #OMG2 will be his back to back 8th disaster pic.twitter.com/VDtQ8kEPuW
अगर फ़िल्म में अक्षय कुमार भगवान शिव के रूप में बने हैं तो कृपया इस सीन से फ़िल्म को हटाया जाए.. रेलवे के इस पानी से महादेव शिव का जलाभिषेक करते दिखाया गया हैं, ये हिंदुओं की आस्था से खेलने जैसा है. @Sadhvi_prachi @beingarun28 #OMG2 #AkshayKumar𓃵 pic.twitter.com/it0RzPk8vx
— Shikhar Negi (@ImshikharNegi) July 11, 2023
'ओएमजी-2' या चित्रपटात अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
OMG 2 Teaser Out: "रख विश्वास, तू है शिव का दास"; ओएमजी-2 चा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस