November OTT Web Series : नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; 'या' वेबसीरिज होणार रिलीज
OTT Web Series : नोव्हेंबर महिन्यात अनेक वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत.
November OTT Web Series : ओटीटीवर दर महिन्यात विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या, वेगवेगळ्या धाटणीच्या वेबसीरिज (Web Series) प्रदर्शित होत असतात. या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. नोव्हेंबर (November) महिन्यात ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यामध्ये ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिजबद्दल...
आर्या 3 (Aarya 3)
कधी रिलीज होणार? 3 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'आर्या' आणि 'आर्या 2' या वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता 'आर्या 3' (Aarya 3) हा सीरिजच्या माध्यमातून सुष्मिता ओटीटी विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये सुष्मितासह सिकंदर खेर, इंद्रनील सेनगुप्ता, इला अरुण, विकास कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक ही सीरिज पाहू शकतात.
द रेल्वे मेन (The Railway Men)
कधी प्रदर्शित होणार? 18 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
'द रेल्वे मेन' या सीरिजची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या सीरिजच्या माध्यमातून यशराजने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. 18 नोव्हेंबरला ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. आर. माधवन, केके मेनन, बाबिल खान आणि दिव्येंदु हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असून चार भागांचीच ही सीरिज आहे. शिव रवैलने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
स्कॅम 2 (Scam Part 2)
कधी प्रदर्शित होईल? 3 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? सोनी लिव्ह
'स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी 2' पार्ट 2 ही सीरिज 3 नोव्हेंबरला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. गगन देव रियार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर हंसल मेहताने या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
अपूर्वा (Apurva)
कधी प्रदर्शित होणार? 15 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार
अपूर्वा या सीरिजमध्ये तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे. 15 नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बॅनर्जी आणि राजपाल यादव या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
टेम्पटेशन आयलँड इंडिया (Temptation Island India)
'टेम्पटेशन आयलँड इंडिया' हा नवा कार्यक्रम ओटीटी विश्व गाजवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मौनी रॉय आणि करण कुंद्रा हा शो होस्ट करणार आहेत. नोव्हेंबरपासून जिओ सिनेमावर हा कार्यक्रम सुरू होईल.
संबंधित बातम्या