एक्स्प्लोर
सलमान खानच्या गाण्यावर न्यूझीलंड पोलिसांचा ठेका

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आपल्या अभिनयामुळे आणि दिलखुलास शैलीमुळे जगभर प्रसिद्ध आहे. जगातील अनेक देशांमध्ये सलमानचे चाहते आहेत. सलमानची हेअर स्टाईल, डान्स स्टाईल, कपड्यांची स्टाईल इत्यादी कॉपी करणाऱ्यांचीही कमी नाही. याचाच एक प्रत्यय न्यूझीलंडमध्ये आला. न्यूझीलंडमधील पोलिसांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या एका गाण्यावर न्यूझीलंड पोलिसांनी ठेका धरला आहे. ‘पांडे जी बजाए सीटी’ आणि ‘बेबी को बेस पसंद है’ या दोन गाण्यांवर न्यूझीलंड पोलिस थिरकताना या व्हिडीओत दिसत आहेत. जनतेच्या मनात संवादाचं आणि मैत्रिचं नातं तयार व्हावं म्हणून पोलिसांनी दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अशाप्रकारे डान्स केल्याचं म्हटलं जात आहे. क्रिस लिन नावाच्या पत्रकाराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळतो आहे. हजारोंच्या संख्येने लोक व्हिडीओ शेअर करत आहेत. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























