(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Netflix Top 10 Movies Web Series : अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट पाहायला आवडतात? नेटफ्लिक्सवरील 'TOP 10' चित्रपट अन् सीरिज नक्की पाहा
Netflix Top 10 Movies Web Series : नेटफ्लिक्सवर विविध वेबसीरिज आणि चित्रपट रिलीज होत असातात. जाणून घ्या नेटफ्लिक्सवरील टॉप 10 चित्रपट आणि वेबीसीरिजबद्दल...
Netflix Movies And Web Series : ओटीटीवर (OTT) अॅक्शन आणि थ्रिलर चित्रपट (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) रिलीज होत असातात. चांगल्या कलाकृती पाहण्याची इच्छा असेल तर ओटीटी प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य ऑप्शन आहे. आता एक चांगला शो पाहायचा असेल तर नेटफ्लिक्सवर पाच धमाकेदार सीरिज उपलब्ध आहेत. हे सर्व नेटफ्लिक्सच्या सर्वोत्कृष्ट वेब सीरिज आहेत. आयएमडीबीवर याला 10 पैकी 8 रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटांत तुम्हाला जबरदस्त अॅक्शन, रोमान्स आणि रहस्य पाहायला मिळेल. जाणून घ्या नेटफ्लिक्सवरील टॉप 10 चित्रपट आणि वेबीसीरिजबद्दल...
मार्वल डेयरडेविल (Marvel Daredevil)
नेटफ्लिक्सच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये मार्वलच्या 'डेयरडेविल'चा समावेश होतो. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन आहे. या शोमध्ये चार्ली कॉक्स, एल्डन हेन्सनसह अनेक कलाकारांचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार आहे. यायएमडीबी रेटिंगमध्ये या चित्रपटाला 10 पैकी 8.6 रेटिंग मिळाले आहे.
नारकोस (Narcos)
'नारकोस' या अमेरिकन नाट्यमय सीरिजची निर्मिती क्रिस ब्रैंकाटो, कार्लो बर्नार्ड आणि डॉग मीरोने केली आहे. सीझन 1-2 कोलंबियाई नार्को टेरेरिस्ट आणि ड्रग माफिया पाब्लो एस्कोबारची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. आयएमडीबीवर यी सीरिजला 8.8 रेटिंग मिळाले आहे.
स्वीट गर्ल (Sweet Girl)
नेटफ्लिक्सच्या टॉप 10 वेबसीरिजमध्ये 2021 मध्ये आलेल्या 'स्वीट गर्ल'चाही समावेश आहे. आपल्या पत्नीच्या मृत्यूचा बदला घ्यायला निघालेल्या एका व्यक्तीची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.
माय नेम इज वेंडेटा (My Name is Vendetta)
'माय नेम इज वेंडेटा' या 2022 मध्ये आलेल्या चित्रपटाचं सोशल मीडियापासून क्रिटिक्सपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. या चित्रपटाचं कथानक खूपच रोमांचक आहे.
अंडरग्राऊंड (6 Underground)
6 अंडरग्राऊंड या सीरिजमध्ये सहा लोकांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सहा लोकांना मुश्किल टास्क दिले जातात. हे आपलं भविष्य बदलतात.
मनी हाइस्ट
बँक रॉबरीची एक गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये जबरदस्त रहस्य आणि रोमान्च दाखवण्यात आलं आहे. प्रत्येक सीझन रोमांचक आहे.
कोहरा
कोहरा शानदार सीरिज आहे. एका तरुण मुलाची गोष्ट या सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. लग्नाच्या एक दिवसआधी या मुलाचं निधन होतं.
दिल्ली क्राइम
दिल्ली क्राइम ही नेटफ्लिक्सची शानदार वेबसीरिज आहे. निर्भया केसबद्दल या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या