एक्स्प्लोर

Nene Vasthunna Teaser : 'नेने वस्थुन्ना'मध्ये धनुष दिसणार दुहेरी भूमिकेत; टीझर आऊट

Nene Vasthunna Teaser : धनुषचा 'नेने वस्थुन्ना' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nene Vasthunna Teaser : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) सध्या त्याच्या आगामी 'नेने वस्थुन्ना' (Nene Vasthunna) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे. 

'नेने वस्थुन्ना' या सिनेमात धनुषचा रावडी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच थरार नाट्यदेखील पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. टीझर फ्लॅशबॅगमध्ये जाणारा आहे. 'नेने वस्थुन्ना' या सिनेमाची बांधणी वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे याचा ट्रेलरवरून अंदाज येतो. 

'नेने वस्थुन्ना' 29 सप्टेंबरला होणार रिलीज

ट्रेलर रिलीज झाल्याने धनुषचे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. दोन वेगळ्या भूमिका धनुषने चांगल्या पेलवल्या आहेत. 'धनुष फक्त अभिनयच करत नाही तर ते पात्र जगतो आहे', 'धनुष एक अभ्यासू अभिनेता आहे', टीझरवर चाहते अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 'नेने वस्थुन्ना' हा सिनेमा 29 सप्टेंबरला रिलीज होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

धनुषचा जगभरात डंका

धनुषनं द ग्रे मॅन (The Gray Man) या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला. धनुष हा 160 कोटी संपत्तीचा मालक आहे. धनुष एका चित्रपटासाठी सात ते आठ कोटी मानधन घेतो. चेन्नईमध्ये धनुषचे आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 25 कोटी आहे. धनुषकडे रेंज रोव्हर, रॉल्स रॉयस घोस्ट आणि  मर्सिडीज बेंज यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. 

धनुषच्या 'थिरुचित्रम्बलम' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

'थिरुचित्रम्बलम' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांचं मन या चित्रपटानं जिंकलं आहे. धनुषच्या नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ग्रे मॅन चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही पण त्याच्या 'थिरुचित्रम्बलम' या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

टीझर पाहा : 

संबंधित बातम्या

Thiruchitrambalam : 'धनुष'च्या 'थिरुचित्रम्बलम' चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

The Gray Man Review : बिग स्टार कास्ट असणारा बोरिंग सिनेमा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Embed widget