Aaliya Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी मिस्ट्री मॅनच्या प्रेमात; म्हणाली,"आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे"
Aaliya Siddhiqui : नवाजुद्दीनची पत्नी आलिया सिद्दीकी आता एका मिस्ट्री मॅनच्या प्रेमात पडली आहे.
Nawazuddin Siddiqui Aaliya Siddhiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवाजुद्दीनची पत्नी अर्थात आलियाने अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सध्या त्यांच्या सेटलमेन्टची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान आलिया सिद्दीकीच्या एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या व्हिडीओनंतर आलिया सिद्दीकी पुन्हा एकदा एका व्यक्तीच्या प्रेमात पडली असल्याचं म्हटलं जात आहे.
आलिया सिद्दीकीने शेअर केला मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो (Aaliya Siddhiqui Post)
आलिया सिद्दीकी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आता तिने एका मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"ज्या नात्यात विश्वास, प्रेम, आपुलकी होती. त्या नात्यातून बाहेर पडायला मला 19 वर्षे लागली आहेत. त्यावेळी माझी मुलं माझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानी होती आणि ती आजही आहेत".
आलियाने पुढे लिहिलं आहे,"कोणतीही गोष्ट करताना सर्वात आधी मी मुलांचा विचार करते. पण काही नाती ही मैत्रीच्या पलीकडे असतात. आमचं नातं मैत्रीच्या पलीकडचं आहे. या नात्याबद्दल मला खूप आनंद आहे. आता हा आनंद मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का?".
View this post on Instagram
आलिया आणि नवाजला शोरा आणि यानी ही दोन मुलं आहेत. सध्या आलिया त्यांच्यासोबत दुबईत आहे. आता तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिचा मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या पोस्टवर तुला आनंदी राहण्याचा अधिकार आहे, नवीन प्रवासासाठी शुभेच्छा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आलिया सिद्दीकी नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाली की,"आता मी पुढे गेले असून मुलांसाठी जगायचं ठरवलं आहे. आमचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. माझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती आल्याचा मला आनंद आहे. पैसे तुम्हाला आनंद देत नाहीत हे मला या व्यक्तीने समजावलं आहे. दुबईतच आमची भेट झालेली आहे".
संबंधित बातम्या