Chandrayaan 3 : 'है इंडिया तेरे साथ!'; चांद्रयान 3 मोहीम आणि ISRO मधील शास्त्रज्ञांसाठी तयार करण्यात आलेले 'हे' खास अँथम साँग नक्की ऐका
Chandrayaan 3 : नॅशनल जिओग्राफिक (National Geographic Channel) या चॅनलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास अँथम साँग (Special Anthem) शेअर करण्यात आलं आहे.

Chandrayaan 3 : इस्रोचं (ISRO) 'चांद्रयान-3' (Chandrayaan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या ऐतिहासिक क्षणाकडे लागले आहे. भारतातील नागरिक या ऐतिहासिक क्षणाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच नॅशनल जिओग्राफिक (National Geographic Channel) या चॅनलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास अँथम साँग (Special Anthem) शेअर करण्यात आलं आहे. या गाण्यात चांद्रयान 3 च्या संबंधित व्हिज्युअल्स आणि भारतातील नागरिकांचा उत्साह पहायला मिळत आहे.
नॅशनल जिओग्राफिकने चांद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगसाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि ISRO मधील शास्त्रज्ञांना सलाम करण्यासाठी है इंडिया तेरे साथ या विशेष अँथम साँगची निर्मिती केली आहे. या अँथम साँगमध्ये चांद्रयान 3 मोहीमबाबत भारतातील लोकांमध्ये असणारा उत्साह पहायला मिळत आहे.
नॅशनल जिओग्राफिकचं है इंडिया तेरे साथ गाणे-
तू होकर बेफिकर,रख ऊंचा अपना सर
मिशन को मन मै रख के,टशन से आगे बढ
सच होंगे सारे ख्वाब, खाई है जो कसम
बुलंदी के परे ले उडान,है इंडिया तेरे साथ
पाहा गाणं:
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
है इंडिया तेरे साथ या अँथम साँगला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनलच्या युट्यूब चॅनलवर देखील है इंडिया तेरे साथ हे अँथम साँग शेअर करण्यात आलं आहे. युट्यूब कमेंट करुन अनेकांनी या अँथम साँगचे कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'या खास गिफ्टबद्दल नॅशनल जिओग्राफिकचे आभार' तर एका युझरनं कमेंट केली, 'हे ऐकून अंगावर शहारे आले, जय हिंद'
नॅशनल जिओग्राफिक चॅनल (National Geographic Channel) आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर ( Disney+ Hotstar) चांद्रयान-3 #countdowntohistory चे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. चांद्रयान-3 ने 14 जुलै 2023 पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. चांद्रयान-3 पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. भारत या मोहिमेत यशस्वी ठरल्यास चंद्रावर पोहोचणार चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चं आता थेट प्रक्षेपण पाहता येणार; 'असं' पाहा चांद्रयान 3 चं लँडिंग
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
