National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज होणार घोषणा; 'हे' चित्रपट आहेत शर्यतीत
National Film Awards 2023: आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे.
National Film Awards 2023: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Film Awards 2023) आज (24 ऑगस्ट) घोषणा होणार आहे. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज संध्याकाळी 5 वाजता केली जाणार आहे आहे. यंदा कोणते चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणार आहेत? याकडे सगळ्यांचे लक्ष लगले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मल्याळम भाषेतील चित्रपट हे मोठ्या संख्येनं हिंदी चित्रपटांना टक्कर देत आहेत. यंदा नायट्टू आणि मिन्नाल मुरली या दोन चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत . तसेच राजमोली यांचा RRR हा चित्रपट देखील जोरदार टक्कर देणार आहे. ऑस्कर अवॉर्ड जिंकलेले संगीतकार एम.एम. कीरवणी हे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये देखील बाजी मारतात का? ते पाहावं लागेल.
तसेच मल्याळम चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपट देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी तसेच रॉकेट्री, हे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणीतील पुरस्कारासाठी आलिया भट्ट आणि कंगना राणौत यांच्या नावाची चर्चा होत आहे. तसेच यंदा कोणत्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळेल? याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.
'नायट्टू', 'मिनल मुरली' आणि 'मेप्पडियन' हे मल्याळम चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या शर्यतीत आहेत . यामधील नायट्टू (Nayattu) या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्टिन प्राकट यांनी केले आहे. या चित्रपटात जोजू जॉर्ज, कुंचको बोबन यांनी प्रमुख भूमिका साकारली. नायट्टू हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 'नायट्टू' हा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपलं नाव कोरेल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणेचा कार्यक्रम PIB इंडियाच्या फेसबुक पेजवर आणि त्यांच्या YouTube चॅनेलवर थेट पाहता येईल.
गेल्या वर्षी '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' (68th National Film Awards 2022) सोहळा नवी दिल्लीत पार पडला होता. तान्हाजी, सूराराई पोट्ट्रू या चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा असल्यानं चित्रपटसृष्टी तसेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
गेल्या वर्षी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. तसेच गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
संबंधित बातम्या