Naseeruddin Shah : 'मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झालीये'; नसिरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष, निवडणूक आयोगाबाबत म्हणाले...
एका मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी सांगितले की, 'मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे.'
Naseeruddin Shah: ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांची ताज (Taj: Divided By Blood) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमध्ये त्यांनी अकबर ही भूमिका साकारली. या वेब सीरिजमधील नसिरुद्दीन यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजमुळे चर्चेत असतात. पण सध्या नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शाह यांनी सांगितले की, 'मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे.' त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. या मुलाखतीमध्ये नसिरुद्दीन शाह यांनी निवडणूक आयोगबाबत देखील वक्तव्य केलं आहे.
नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, "काही चित्रपट आणि शो यांचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. यासोबतच चित्रपट आणि शो यांचा वापर निवडणुकीत मते मिळविण्यासाठीही केला जात आहे. सत्ताधारी पक्ष अतिशय चतुराईने त्यांचा वापर करत आहे, त्यामुळेच आजकाल शिकलेल्या लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे ही फॅशन झाली आहे."
पुढे नसिरुद्दीन शाह यांनी सांगितलं, "निवडणूक आयोगही अशा गोष्टींवर मौन बाळगतो. राजकीय पक्ष निवडणुकीसाठी धर्माचा वापर करतात तेव्हा निवडणूक आयोग गप्प बसतो. दुसरीकडे, अल्ला हू अकबर, म्हणत कोणत्याही मुस्लिम नेत्याने मते मागितली असती तर आतापर्यंत मोठा गदारोळ झाला असता."
नसिरुद्दीन शाह हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, 'मुघल आक्रमक, अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माते होते' त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले होते.
नसिरुद्दीन शाह यांचे चित्रपट
1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम पांच' या चित्रपटांमधून नसिरुद्दीन शाह यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मासूम, कर्मा, इजाज़त, जलवा, हीरो हीरालाल, गुलामी, त्रिदेव, विश्वात्मा, मोहरा गर्ल इन येलो बूट्स, डर्टी पिक्चर, 7 खून माफ, तेरा सुररूर या चित्रपटांमधील नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी त्यांची ताज ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. या वेब सीरिजमध्ये नसिरुद्दीन शाह यांच्यासोबतच अभिनेत्री अदिती राव हैदरी, आशिम गुलाटी, संध्या मृदुल, राहुल बोस या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
Naseeruddin Shah : दाक्षिणात्य चित्रपटांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं; नसीरुद्दीन शाह यांचं रोखठोक मत