एक्स्प्लोर

कोरोनामुळे संगीतकार वाजिद खान यांचं निधन; आता आईलाही कोरोनाची लागण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यानंतर त्यांची आई रजीना खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं रविवारी (31 मे) रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. त्यानंतर साजिद-वाजिद यांची आई रजीना खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कुटुंबातील व्यक्तींनी मंगळवारी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, 'रजीना खान यांना चेंबुर येथील सुराणा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.' दिवंगत संगीतकार वाजिद खानही याच रुग्णालयात उपचार घेत होते.

कुटुंबातील एका व्यक्तीने बोलताना सांगितले की, 'संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.' 42 वर्षीय वाजिद खान यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोना व्हायरस आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांनी मुंबईच्या चेंबूरमधील सुराणा सेठीया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

साजिद-वाजिद यांची आई कोरोना पॉझिटिव्ह

असं सांगण्यात येत आहे की, बॉलिवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांची आई रजीना खान यांना आपला मुलगा वाजिद खानच्या आधीच कोरोनाचा संसर्ग झाला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजीना खान यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. असं सांगण्यात येत आहे की, आजारी वाजिद खान यांच्या देखभालीसाठी त्यांची आई रुग्णालयात थांबली होती. त्यावेळी इतर कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली.

दरम्यान, साजिद-वाजिद या जोडीने लॉकडाऊनमध्येच काही गाणी कंपोज केली होती. यामध्ये सलमान खानचं गाणं 'प्यार करोना'चाही समावेश होता. एप्रिलमध्ये रिलीज करण्यात आलेलं हे गाणं सलमान खानने गायलं होतं. साजिद-वाजिद यांचं सलमान खानसोबत एक खास नातं होतं. सलमान खाननेच त्यांना 1998मध्ये बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. 1998 मधील सलमान-काजोल यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाद्वारे साजिद-वाजिद यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर वाजिद यांनी साजिदच्या साथीने सलमान खानच्या तेरे नाम, मुझसे शादी करोगी, पार्टनर, हेलो, गॉड तुस्सी ग्रेट हो, वॉण्डेड, वीर, दबंग, एक था टायगर, नो प्रॉब्लम या सांरख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं.

साजिद-वाजिद यांनी क्या यही प्यार है, किलर, शादी करके फंस गया यार, चोरी-चोरी, कल किसने देखा, तुमको न भूल पाएंगे, जाने क्या होगा, कल किसने देखा इत्यादी चित्रपटांनाही संगीत दिलं. याशिवाय सारेगामापा या म्युझिकल कार्यक्रमाशीही ते अनेक वर्ष जोडले होते.

संबंधित बातम्या : 

प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन

रेल्वे स्टेशनवर मृत आईला उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याच्या मदतीसाठी शाहरुख खान सरसावला

नवाजुद्दीनच्या धाकट्या भावावर पुतणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget