Mumbai : मुंबईत अभिनेत्रीवर बलात्कार, मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक
Mumbai : लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Mumbai : मुंबईच्या (Mumbai) एन.एम जोशी पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने टांझानियाचा (Tanzania) रहिवासी असलेल्या विरेन पटेल (Viren Patel) नामक व्यक्तीवर बलात्कार आणि जबर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वर्षभरावापूर्वी आरोपी विरेन आणि अभिनेत्रीची ओळख झाली. विरेनने या अभिनेत्रीला लग्नाचे आमिश दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. लग्नासंबंधित विचारताच तो या अभिनेत्रीला मारहाण करीत असे. अखेर याला कंटाळून या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात विरेन विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळताच पीडित अभिनेत्रीने मध्यरात्री एन.एम जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी तिला योग्य माहिती दिली नाही. मुंबई पोलीस आपल्याला योग्य मदत करीन नसल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे.
अभिनेत्रीने 13 फेब्रुवारीपासून विरेन पटेलसोबत राहावयास सुरुवात केली. आमच्यात घनिष्ट मैत्रीचे संबंध निर्माण झाले. सोबत राहत असताना विरेन पटेलने अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली. दोघेही गुजराती समाजाचे असल्याने तसेच लग्नाचं वय असल्याने अभिनेत्रीनेदेखील लग्नाकरीता होकार दिला. यासंदर्भात आम्ही आमच्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यांनीदेखील आमच्या नात्याला कबुली दिली.
लग्नाला होकार दिल्यानंतर आरोपी अभिनेत्रीसोबत वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. पण लग्न होणार असल्याने अभिनेत्रीने सुरुवातीला यागोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण एकेदिवशी विरेन नषा करुन आला आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही एकदा तो तिला घेऊन मित्राच्या फार्म हाउसवर गेला. त्यावेळीही त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेकदा अभिनेत्रीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
विरेन पटेलवर गुन्हा दाखल
भारतीय दंड संहितेच्या कलम 376, कलम 323, कलम 504 नुसार विरेन पटेलवर गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंबईत अनेकदा नवोदित कलाकारांना प्रामुख्याने महिला कलाकारांना अत्याचार, बलात्कार या गोष्टींचा सामना करावा लागतो. काम मिळवून देतो असं सांगून आजवर अनेक नवोदित महिला कलाकारांना फसवण्यात आलं आहे. शारीरिक संबंध ठेवल्यास लगेचच काम देऊ असं सांगून मुलींची फसवणूक करण्यात येते. बॉलिवूडमध्ये अनेक नामांकित कलाकारांनादेखील या प्रकरणाचा सामना करावा लागत आहे.
संबंधित बातम्या