Hustle Season 3: "शिवरायांचा मावळा मी..."; अमरावतीच्या तरुणाच्या मराठमोळ्या रॅपनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
Hustle Season 3: हसल या शोमधील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमरावतीचा एक तरुण त्याचा मराठमोळा रॅप सादर करताना दिसत आहे.
Hustle Season 3: सध्या हसल (Hustle Season 3) या कार्यक्रमाचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या सीझनमध्ये विविध रॅपर त्यांचे रॅप प्रेक्षकांसमोर सादर करत आहेत. रॅपर आणि गायक बादशाह (Baadshah) हा हसल या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनचं परीक्षण करत आहे. हसल या शोमधील एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमरावतीचा एक तरुण त्याचा मराठमोळा रॅप सादर करताना दिसत आहे.
अमरावतीच्या सौरभ अभ्यंकर उर्फ 100RBH नं हसल या कार्यक्रमात त्याचा मराठी रॅप सादर केला. त्याचा हा रॅप ऐकल्यानंतर हसल कार्यक्रमाचे सर्व परीक्षण माइक ड्रॉप केला. तसेच EPR, डिनो जेम्स आणि Dee MC या रॅपर्सनं सुद्धा सौरभचं भरभरुन कौतुक करतात.
100RBH चा मराठी रॅप-
"आला अमरावतीचा पोरगा, खरं-खरं मी गाण्यात संगतो,
जे पाहिलं जे अनुभवलं, सारं गण्यात माझ्या मी मांडतो,
अरे शिवरायांचा मावळा हाओ मी भेत नाही पण भेवाडतो'
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
सध्या सौरभ अभ्यंकर उर्फ 100RBH ची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. युट्यूबवर 100RBH चं हे मराठी रॅप ट्रेंड देखील करत आहे. सध्या हे रॅप युट्यूबवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. आता हसल या कार्यक्रमात सौरभ आणखी कोणते रॅप सादर करणार हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
सौरभ हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 24.2K फॉलोवर्स आहेत. सौरभचं याआधी डेंजर हे रॅप प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
'हसल'मध्ये मराठी रॅपची हवा!
हसल या कार्यक्रमात अनेक स्पर्धक हे मराठी रॅप सादर करतात. गेल्या वर्षी आर्या जाधव (Aarya Jadhao) या तरुणीनं हसल 2.0 या कार्यक्रमात मराठी रॅप सादर केला. या रॅपच्या ओळींनी अनेकांचे लक्ष वेधले. 'मै और मेरी नऊवारी' अशा या रॅपच्या ओळी आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
Hustle 2.0 : 'मै और मेरी नऊवारी'; तरुणीच्या मराठमोळ्या रॅपनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ