Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Mrunal Dusanis Daughter Photo : मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस चार वर्षांनी लेकीसह आता भारतात परतली आहे. मृणालची लेक क्युटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या स्टारकिड्सला टक्कर देताना दिसून येत आहे.
Mrunal Dusanis : मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) आता चार वर्षांनी लेकीसह भारतात परतली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत कमबॅक करण्यासाठी मृणाल आता सज्ज आहे. मृणालने परदेशात असताना नूर्वीला (Nurvi) जन्म दिला. आता मृणाल नूर्वीसह पहिल्यांदाच भारतात आली आहे. मृणालची लेक नूर्वी क्युटनेसच्या बाबतीत बॉलिवूडच्या स्टारकिड्सला टक्कर देताना दिसून येत आहे. नूर्वी आता दोन वर्षांची आहे. 24 मार्च 2024 रोजी तिचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
नूर्वीच्या येण्याने बदललं मृणालचं आयुष्य (Mrunal Dusanis Daughter Photo)
नूर्वीच्या येण्याने मृणाल दुसानिसचं आयुष्य बदललं आहे. याबद्दल एबीपी माझाशी बोलताना मृणाल म्हणाली,"नूर्वीच्या येण्याने आयुष्य खूपच बदललं आहे. नूर्वीमुळे मी आई होऊ शकले आहे. आता आईपण नव्याने अनुभवता येत आहे. तिच्यामुळे माझ्या आयुष्यात थोडा पेशन्स आलाय. एक लहान मुल सांभाळणं किती अवघड असतं हे मला कळतय. लहान मुल सांभाळायला अख्ख गाव लागतं, असं म्हटलं जातं. ते आता मला खरं वाटू लागलं आहे".
नूर्वीबद्दल बोलताना मृणाल म्हणाली,"नूर्वीला प्रचंड मस्ती करायला लागतं. आम्ही दोघी एकत्र गाणी म्हणतो, डान्स करतो, कार्टून एकत्र पाहतो. एकत्र गोष्टीची पुस्तके वाचतो. कोरोनाकाळात परदेशात बाळाला जन्म देणं माझ्यासाठी थोडं अवघड होतं. प्रेग्नंसीदरम्यान घरचं कोणी नव्हतं. मी आणि नीरज आम्ही दोघेच होतो. त्यामुळे ते नऊ महिने, माझं पहिलं बाळंतपण यासर्व गोष्टी नव्या देशात, नवीन माणसांसोबत पार पडल्या. पण माझ्यासाठी हा चांगला अनुभव होता. त्याकाळात नीरजने माझी खूप काळजी घेतली. आमच्या दोघांचा बॉन्ड त्यामुळे खूप स्ट्राँग झाला.एकंदरीत बाळंतपणाची संपूर्ण प्रोसेसदरम्यान नूर्वीच्या आगमनाची खूप उत्सुकता होती".
मृणालने लेकीचं नाव नूर्वी का ठेवलं? (Nurvi Meaning)
नूर्वीचा खरा अर्थ 'लक्ष्मी' असा आहे. तसेच याचा दुसरा अर्थ 'आशीर्वाद' असाही आहे. मृणाल म्हणते,"मला असं वाटतं की, पहिली मुलगी 'लक्ष्मी' असते. त्यामुळे आम्ही तिचं नाव 'नूर्वी' असं ठेवलं आहे. नावाप्रमाणेच आमची 'नूर्वी' देवाने दिलेला आशीर्वादच आहे. नूर्वी खूपच समजुतदार आणि गोड आहे".
आईला त्रास न देणारी नूर्वी!
नूर्वीबद्दल बोलताना मृणाल पुढे म्हणते,"नूर्वीची आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तिची मेमरी आणि ग्रासपिंग पॉवर खूप स्ट्राँग आहे. त्यामुळे गोष्टी ती पटकन आत्मसात करते. तिला नवीन गोष्टी पाहायला आवडतं. सगळ्या गोष्टींची तिला उत्सुकता आहे. नूर्वी तालात आहे. तिच्या या गोष्टीचं मला आश्चर्य आणि कौतुक आहे. नूर्वी प्रचंड समजूतदार आहे. गोष्टींबाबत तिला एक चांगली समज आहे. नूर्वी कोणत्याच गोष्टीचा त्रास देत नाही. किंवा ती देत असेल तरी तो मला होत नाही. खाण्याच्या बाबतीत कधीकधी थोडे नखरे करते. त्याव्यतिरिक्त कोणताही त्रास देत नाही".
पहिल्यांदा भारतात आल्यानंतर नूर्वीची काय प्रतिक्रिया होती?
मृणाल म्हणते,"भारतात आल्यानंतर नूर्वी थोडी घाबरली होती. तिला एवढ्या माणसांची आणि गर्दीची सवय नव्हती. भारतात आल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस नूर्वीसाठी थोडे अवघड होते. एवढा प्रवासही तिने पहिल्यांदाच केला. घड्याळ बदलल्यामुळे तिचं पूर्ण रुटिन बदललं. नूर्वीला आता दररोज मंदिरात जायला, गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आवडू लागलं आहे".
संबंधित बातम्या