एक्स्प्लोर

मिस्टर बीन अलविदा करण्याच्या तयारीत

मिस्टर बीन या वेंधळ्या पण अतरंगी व्यक्तिरेखेनं अमाप लोकप्रियता मिळवली. ही व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत आहे रोवन एनकिन्सन. आता मात्र या मिस्टर बीनच्या मनात वेगळेच विचार येतायत.

मुंबई : हा इसम टीव्हीवर आला की टीव्ही पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर कमालीचं कुतूहल दाटतं. आता आपल्या समोर ठेवलेल्या टीव्हीवर आता पुढे काय होणार याची त्याला कमाल उत्सुकता लागून राहते. कारण, समोरच्या टीव्हीवर आलेला असतो एक अफलातून इसम. सुटाबुटात असलेला हा इसम असतो वयाने मोठा. पण याच्या करामती आणि त्याच्याकडे असलेला छोटा टेडी पाहता आपण जे पाहातो आहोत तितकं सोपं प्रकरण हे नाहीय याची खात्री पाहणाऱ्याला पटते आणि त्यानंतर हा सुटाबुटातला इसम तोंडातून एक चकार शब्द न काढता कमाल लवचिकतेनं जी काही धमाल उडवून देतो ती केवळ पाहून चकित करणारी असते.

याच इसमाचं नाव मिस्टर बीन. मिस्टर बीननं जगाला हसवलं. खरंतर मूक नाट्याचा फॉर्म घेऊन या मिस्टर बीननं अनेक करामती केल्या. ही व्यक्तिरेखा साकारणारा अवलिया कलाकार आहे, रोवन एटकिन्सन. आता रोवन जवळपास 65 वर्षांचे आहेत. आजही त्यांना मिस्टर बीन म्हणूनच ओळखलं जातं. पण आता हेच मिस्टर बीन आपल्या अवताराला कंटाळले आहेत. साक्षात रोवन यांनीच ही गोष्ट कबूल केली आहे.

सध्या रोवन हे एनिमेटेड मिस्टर बीनवर काम करतायत. वास्तविक बीन साकारण्यापेक्षा हा एनिमेटेड बीन साकारणं तुलनेनं त्यांना सोपं जातं आहे. यावेळी बोलताना रोवन यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, आता मला मिस्टर बीन साकारताना तितकी मजा येत नाही. कारण, मिस्टर बीन साकारताना मी पुरता थकून जातो. दमून जातो. शिवाय, आजवर लोकांनी मिस्टर बीनवर अमाप प्रेम केलं आहे. त्याचं ओझं खूप आहे. मिस्टर बीन साकारताना हे ओझं मला सतत जाणवत असतं. त्यामुळे आता मिस्टर बीन या व्यक्तिरेखेला रामराम ठोकायचा माझा विचार आहे. आता हा अलविदा कसा करायचा.. याबद्ल अद्याप माझ्या मनात निश्चित असं काही ठरलेलं नाही. पण लवकर मला त्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे.

मिस्टर बीन जगभरात तुफान लोकप्रिय झाला. 1990 ते 1995 या पाच वर्षात मिस्टर बीनचे वेगवेगळे एपिसोड्स आले. त्यानंतर रोवन एटकिन्सन लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. मिस्टर बीन यांचं पुढे एनिमेशन आलं. कार्टून आलं. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिस्टर बीन लोकांचं रंजन करत होता. पण आता मात्र रोवन यांनाच बीनला अलविदा करायचा आहे. मिस्टर बीन मुळात वेंधळं कॅरेक्टर आहे. आपल्या उचापत्यांमुळे तो आपल्यासह आपल्यासोबतच्या इतरांनाही कसा अडचणीत आणतो त्याचे एपिसोड्स लोकप्रिय आहेत. रोवन यांनी आपल्या अभिनयाने ही व्यक्तिरेखा अजरामर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pandavani Singer Dr. Teejan Bai: पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?
'वेलकम टू द जंगल'ची BOX ऑफिसवर ‘शंभरी’, 'अल्फा'लाही टाकलं मागे, 9 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले?
Urvashi Dholakia Son Kshitij Dholakia: प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाला पावसाचा फटका; गाडीवर थेट झाड कोसळलं, चारचाकीचा झाला चेंदामेंदा, VIDEO
Shraddha Kapoor Likely to Visit Narayangaon: 'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...
'ईठा' सिनेमाच्या टीमचा मोठा निर्णय, प्रदर्शनापूर्वी नारायणगावला देणार भेट, श्रद्धा कपूरही जाणार; विठाबाईंचे नातू म्हणाले...

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir : सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
सुषमा अंधारे, बाबाजी काळेही तुमच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत येणार का? सचिन अहिरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुसळधार पावसामुळे तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ, सध्याच्या घडीला किती टक्के पाणीसाठा?
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut: मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Embed widget