एक्स्प्लोर
Advertisement
रिव्ह्यू : टेक केअर गुड नाईट
एक दिवस अचानक अविनाश यांच्या बॅंक अकाऊंटमधले 50 लाख रूपये कोणीतरी काढून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास येतं. हा सगळा व्यवहार आॅनलाईन झालेला असतो. हबकलेले अविनाश सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करतात.
आजचा काळ हा आॅनलाईन असण्याचा काळ आहे. म्हणजे बॅंकेच्या बिलापासून भाजी घरी मागवण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण हल्ली आपल्या अॅपकरवी आॅनलाईन करत असतो. कारण आजचा जमाना डिजिटल युगाचा आहे. याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही. फायद्यांचं महत्त्व आपल्या सगळ्यांना पदोपदी पटवून दिलं जातं. पण त्यातल्या धोक्यांबाबत दरवेळी सांगितलं जातं असं नाही. गिरीश जोशी यांनी याच सायबर क्राईमला हाताशी धरून 'टेक केअर गुड नाईट' हा चित्रपट बनवला आहे. सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे, महेश मांजरेकर, जयवंत वाडकर अशी सगळी कास्ट या सिनेमात आहे. या सिनेमाचा एकूण विषय आणि त्याची गरज पहाता हा सिनेमा नवी माहिती पुरवतो. गोष्ट म्हणून यातलं कथाबीज काहीसं सौम्य असलं तरी अनेक नव्या गोष्टीचा उलगडा इथे होते. या विषयाची आजची गरज मोठी आहे.
हा विषय अविनाश यांच्या भोवती फिरतो. अविनाश एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावरून रिटायर्ड झाले आहेत. एक दिवस अचानक त्याच्या बॅंक अकाऊंटमधले 50 लाख रूपये कोणीतरी काढून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास येतं. हा सगळा व्यवहार आॅनलाईन झालेला असतो. हबकलेले अविनाश सायबर क्राईमकडे तक्रार दाखल करतात. मग इन्स्पेक्टर पवार तपास करू लागतात. त्यातून अविनाश यांचं कुटुंबही गोवलं जातं. या सगळ्यातून अविनाश कसे बाहेर पडतात त्याचा हा सिनेमा आहे.
गिरीश जोशी यांनी एका नव्या विषयाला हात घातला आहे यात शंका नाही. फक्त, यात एक नक्की सिनेमाच्या कथेपेक्षा ती गोष्ट इन्फर्मेटरी पातळीवर होऊ लागते. ती इन्फर्मेशन चांगली आहेच, त्यासोबत त्याची गोष्टही तितकीच रंजक असती तर सिनेमा आणखी गुंतवून ठेवणारा झाला असता असं वाटून जातं. या कथेतला हॅकर अॅमॅच्युअर दाखवल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे गोष्टीतली मजा कमी होते. यावर सामान्य लोकांना कळावं म्हणून असं पाऊल आपण उचललल्याचं दिग्दर्शक पिक्चर बिक्चरमध्ये सांगतात. इथे जर पूर्ण ट्रेण्ड हॅकर घेतला तर असे गुन्हे उघडकीस येतच नाहीत असंही यावेळी कळलं अर्थात सिनेमातही त्याचा उल्लेख आहे.
एकूणात विषय महत्वाचा आहेच. त्याला अभिनयाची उत्तम जोड मिळाली आहे. सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश मांजरेकर, विद्याधर जोशी या सर्वांनीच समजून अभिनय केला आहे. शिवाय, परस्पर नातेसंबंधही यात उत्तम अधोरेखित झाले आहेत. हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही. पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत तीन स्टार. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन एकदा पाहायला अजिबातच हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement