एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रिव्ह्यू : स्मर्फ्स : द लॉस्ट व्हिलेज
स्मर्फ्समधील कॅरेक्टर्स त्यांच्यातील गोडव्यामुळे मनाचा ठाव घेतात. त्या सगळ्या गोष्टींचा असलेला माहौल आहे. त्यांच्या असण्यात अन् त्यामधील गोडव्यात एकप्रकारची गंमत आहे. स्मर्फ्स अन् स्मर्फ्स 2मध्ये आपल्याला त्यांचे पांढरे शुभ्र कपडे अन् त्यांच्या ड्रूपी हॅट्स त्यांच्या वागण्या-बोलण्याची त्यांची ढब लय त्यामुळे ही गंमत अधिक वाढत जाते, पण यावेळी मात्र हा सारा खेळ काहीसा अवघड झालेला आपल्याला दिसतो. जादूगार गार्गामेलने स्मर्फेट नावाची एक फिमेल निर्माण केली.
स्मर्फ्सच्या गावातील असलेल्या रहस्याच्या मूलमंत्रापर्यंत ती पोहोचली. आता हा सारा खेळ कशाप्रकारे रोखण्याचं आव्हान स्मर्फ्सच्या टीमसमोर आहे. पण आता पापा स्मर्फ्सने पुढाकार घेतला. त्यांनी जादुई शक्तीने आता स्मर्फेटला त्यामुळे नवा लूक मिळाला आहे. इतकंच नव्हे तर, ती इतरांपेक्षा वेगळी आहे, हे जाणवतं... पण ती स्मर्फसारखी दिसू लागते. स्मर्फ्समधील प्रत्येकाकडे काही ना काही खासियत आहे. त्यामध्ये काहीजणांना विनोदाची खासियत आहे. काहीजण बँकिंगमध्ये तर काहीजणांना शेतीमध्ये गती आहे. पण ती तर मात्र जॅक ऑफ ऑल आहे.
त्यानंतर एके दिवशी स्मर्फिंगची पिकनिक निघते. गार्गमेल पुन्हा अवतरतो अन् तो स्मर्फेटला पकडतो, अन् तिच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून त्याला स्मर्फ्स व्हिलेजबद्दल अन् त्याच्या रहस्याबद्दल अधिक जाणून घेता येतील... माहिती मिळेल... तिथून मार्ग काढून त्याच्या तावडीतून सुटणं हे सगळं अयात मोठं आव्हान तिच्यासमोर आहे. ती हे सारं कशाप्रकारे करते अन् त्या तुरुंगातून ती कशाप्रकारे निघते अन् त्यावेळी तिच्या मनाची अवस्था कशी असते, कारण त्यावेळी तिला क्लम्झी स्मर्फ, ब्रेनी स्मर्फ अन् हेफ्टी स्मर्फ कशाप्रकारे साथसोबत करतात अन् त्या सगळ्याचा माहौल कसा बदलतो, याची ही गोष्ट आहे.
यापूर्वीच्या दोन्ही भागांमध्ये खऱं तर स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग तयार केला होता, मात्र इथे मात्र काहीशी फसलेली फिल्म वाटते. खरंतर हा सिनेमा हा लहान मुलांचा आहे. आपण काहीसे मोठे झालोत, याची जाणीव वेळोवेळी होते. पण सिनेमाची लांबी ही काही अंशी कमी झालेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुलेने क्रिस्पी अन् क्रंची वाटतात. नवीन स्मर्फट्राइबचा प्रकार त्यांनी शोधला, हा भाग निश्चित महत्त्वाचा वाटतो.
स्मर्फेट ही थ्रीडीमध्ये दिसते बाकी सगळा खेळ हा तसा काहीसा कच्चा दुव्यांचा वाटतो. कारण बाकी सारे कॅरेक्टर हे वन डायमेन्शनल भासतात. या सिनेमात जर व्हिलन मोठा झाला तर त्या हिरोला महत्त्व आलं असतं. पण आपल्याला कळतं की, त्या अर्थाने या साऱ्या गोष्टी तितक्या रंजक वाटत नाहीत. करण हिरो हा व्हिलनपेक्षा काकणभर सरस ठरणारा असतो...
स्मर्फेट ही अतिशय बंडखोर अशी मुलगी आहे. त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन जर विचार केला तर तिच्या एकूणच वागण्या बोलण्यात असलेला एक बदल आहे. पण त्या सगळ्या खेळात आपल्याला कुठेही जाणवत नाही, की तिचे हे वेगळेपण इतर कुणाला कसं काय जाणवत नाही. या सगळयात आपल्याला ज्यांचे आवाज आहेत, ते तुलनेने बी स्टार आहेत. ज्युलिया रॉबर्ट्स वगळता... आता तिच्या एकूण अस्तित्त्वाबद्दल अधिक बोलणं हे स्पॉयलर अँलर्ट ठरू शकेल...
या सिनेमातील विनोदाचा दर्जाही आपल्याला जाणवेल की, यापूर्वीच्या दोन्ही सिनेमांना साजेसा नाही. कारण या सिनेमातील विनोदांना, त्यामधील गॅग्जवर आपल्याला हसू येईलच, याची शाश्वती देता येत नाही.
क्लायमॅक्स म्हणजे तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचं आवर्तन वाटेल, कुंग-फू पॅण्डाची आठवण आल्याखेरीज राहणार नाही. त्यामुळे नेमकं नी काय सांगू इच्छितो हे तुम्हाला एव्हाना कळलं असेल...
खरंतर अॅनिमेशन वगळता तशी गोष्टही फार रंजक नाही. फार इंटरेस्टिंग खेळ असेल, अशातला भाग नाही. त्यामुळे गोष्ट नसल्यामुळे गंमत अधिक येत नाही.
का पाहावा – बंडखोर स्मर्फेटसाठी, तिचं अपहरण अन् अपहरण नाट्याच्या खेळासाठी
का टाळावा – गोष्ट फारशी इंटरेस्टिंग नाही. विनोद ही दर्जेदार नाही
थोडक्यात काय – स्मर्फ्समधील ती मजा राहिलेली नाही म्हणून
या सिनेमाला मी देतो दोन स्टार्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement