एक्स्प्लोर

कृतांत : जगणं सोपं करण्याचा प्रयत्न

वर्कोहोलिक असलेला सम्यक आणि त्याला प्रवासाच्या एका वळणावर भेटलेला इसम याची ही गोष्ट आहे. दैनंदिन जगण्यात आणि केवळ कामात अडकलेला सम्यक आणि निसर्गात रमणारा.. पेशन्स, रिअलायझेशन यांच्यावर कमालीचा विश्वास असणारा गृहस्थ यांच्यातलं द्वंद्व इथे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे.

संदीप कुलकर्णी यांचा बऱ्याच काळाने प्रदर्शित होणारा चित्रपट हा या सिनेमाचा मोठा यूएसपी आहे. शिवाय या चित्रपटाचं पोस्टर आणि त्यात संदीपचा गेटअप पाहिल्यानंतर सिनेमाबद्दल त्यातल्या गोष्टीबद्दल उत्सुकता वाढते. आणि याला जबाबदार सिनेमाचं टायटलही आहे. कृतांतच्या नेमक्या अर्थाची व्यक्तिश: कल्पना नाही. पण दिग्दर्शकाने दिलेल्या माहीतीनुसार कृतांत म्हणजे नियती. तर असा हा नियतीच्या खेळाभवती फिरणारा चित्रपट आहे. वर्कोहोलिक असलेला सम्यक आणि त्याला प्रवासाच्या एका वळणावर भेटलेला इसम याची ही गोष्ट आहे. दैनंदिन जगण्यात आणि केवळ कामात अडकलेला सम्यक आणि निसर्गात रमणारा.. पेशन्स, रिअलायझेशन यांच्यावर कमालीचा विश्वास असणारा गृहस्थ यांच्यातलं द्वंद्व इथे मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. यातून जगण्याकडे नव्याने पाहण्याचं सूचना दिग्दर्शक करतो. दत्ता भंडारे यांचा हा पहिला चित्रपट. त्यामुळे माध्यामाबाबत असलेला नवखेपणा यात जाणवतो. शिवाय चित्रपटाला पोषक कथेचा अभाव इथे दिसतो. ही कथा नाटक किंवा एकांकिकेची असावी असं वाटत राहतं. दोन व्यक्तिरेखा आणि एकच ठिकाण यामुळे हा चित्रपट प्रवाही न होता कमालीचा शब्दबंबाळ होतो. शिवाय यातली सम्यकच्या व्यक्तिरेखेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचं वर्कोहोलिक असणं हे समजण्यासारखं आहे, पण त्याचवेळी त्याच आपल्या पत्नीवर, आईवर, मित्रांवर चिडचिड करणं हे अनाकलनीय आहे. त्यामुळे विनाकारण त्याच्या व्यक्तिरेखेला खलनायकी रंग प्राप्त होतो. पूर्वार्धात संथ असलेली पटकथा उत्तरार्धात वेगवान होते. उत्तरार्धात थरार आहे. पण संवांदांची सातत्याने होणारी पुनरावृत्ती मात्र खटकते. संपूर्ण चित्रपट पाहताना एक जमता जमता राहिलेला चित्रपट असं वाटून जातं. संदीप कुलकर्णी, सुयोग गोऱ्हे यांनी नेटानं अभिनय केल्यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो. पण त्यापलिकडे जगण्याचं तत्वज्ञान देणारा हा चित्रपट आणखी गोष्टीत भिजलेला हवा होता असं वाटून जातं. म्हणूनच पिक्चर-बिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत दोन स्टार्स. कृतांत : जगणं सोपं करण्याचा प्रयत्न
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget