Movie Release This Week : रितेश देशमुखचा 'मिस्टर मम्मी' ते जितेंद्र जोशीचा 'गोदावरी'; 'या' आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?
Upcoming Movies This Week : येत्या शुक्रवारी रोमान्स, नाट्य, विनोद, थरार यापैकी एखादा धमाकेदार सिनेमा नक्की पाहा.
![Movie Release This Week : रितेश देशमुखचा 'मिस्टर मम्मी' ते जितेंद्र जोशीचा 'गोदावरी'; 'या' आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार? Movie Release This Week Ritesh Deshmukh Mister Mummy to Jitendra Joshi Godavari Which movie will you watch this week Movie Release This Week : रितेश देशमुखचा 'मिस्टर मम्मी' ते जितेंद्र जोशीचा 'गोदावरी'; 'या' आठवड्यात तुम्ही कोणता सिनेमा पाहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/5b59069888d22de0253300313a6c51f61667805103484254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Movie Release This Week : गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे तीन सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिन्ही सिनेमे कमी पडले आहेत. त्यामुळे या आठवड्यात प्रदर्शित होणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील की नाही असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. या आठवड्यातही अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रेक्षकांना थरार, नाट्य,, अॅक्शन, भयपट अशा अनेक प्रकारचे सिनेमे पाहायला मिळणार आहेत.
सिनेमाचं नाव? ऊंचाई (Uunchai)
कधी होणार रिलीज? 11 नोव्हेंबर
'ऊंचाई' हा सिनेमा मैत्रीवर भाष्य करणारा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारित 'ऊंचाई' हा सिनेमा आहे. सूरज बडजात्याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या मल्टीस्टारर सिनेमात अमिताभ बच्चन आणि परिणीती चोप्रा व्यतिरिक्त अनुपम खेर, बोमन ईरानी, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सिनेमाचं नाव? यशोदा (Yashoda)
कधी होणार रिलीज? 11 नोव्हेंबर
'यशोदा' हा सिनेमा 11 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 'यशोदा' हा सायन्स फिक्शन-थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात समंथा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
सिनेमाचं नाव? मिस्टर मम्मी (Mister Mummy)
कधी होणार रिलीज? 11 नोव्हेंबर
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा येत्या 11 नोव्हेंबरला 'मिस्टर मम्मी' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.शार अली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
सिनेमाचं नाव? गोदावरी (Godavari)
कधी होणार रिलीज? 11 नोव्हेंबर
'गोदावरी' हा प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यानंतर 'गोदावरी' सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
सिनेमाचं नाव? कुलस्वामिनी (Kulaswamini)
कधी होणार रिलीज? 11 नोव्हेंबर
देवीमातेच्या अगाध लीलेचं दर्शन प्रेक्षकांना घडवणारा 'कुलस्वामिनी' हा सिनेमा येत्या 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोगेश्वर ढोबळे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.
संबंधित बातम्या
Adipurush New Release Date : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची रिलीज डेट ढकलली पुढे; निर्मात्यांनी दिली माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)