Alia Bhatt : मातृदिनी आलिया भट्टने शेअर केला आई-सासूसोबतचा खास फोटो
Alia Bhatt : आलिया आणि रणबीर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

Alia Bhatt : जगभरात आज मातृदिन साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वच मंडळी आईसोबतचा फोटो शेअर करत आईसाठी खास पोस्ट लिहित आहेत. दरम्यान आलिया भट्टने (Alia Bhatt) आई आणि सासूसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर आई सोनी राजदान (Soni Razdan) आणि सासू नीतू कपूर (Neetu Kapoor) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आलिया रणबीरच्या वेडिंग पार्टीतील आहे. फोटो शेअर करत आलियाने लिहिले आहे, माझ्या सुंदर आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा.
View this post on Instagram
आलिया आणि रणबीर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले. मुंबईत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर आलियाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली. आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
संबंधित बातम्या























