(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saaho Teaser | प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या 'साहो'चा दमदार टीझर लॉन्च
साहो सिनेमातील अॅक्शन सीन्सवर खास लक्ष देण्यात आलं आहे. बॉलिवूडमधील महागडा अॅक्शन सिनेमा असून सिनेमावर जवळपास 300 कोटी रुपये खर्च झाल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : 'बाहुबली' सिनेमातून घराघरात पोहोचलेला सुपरस्टार प्रभास पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिकण्यास तयार आहे. प्रभासच्या आगामी 'साहो' सिनेमाचा दमदार टीझर लॉन्च झाला आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी साहो सिनेमाच्या टीझरबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.
'साहो' सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर सिनेमा अॅक्शनने भरपूर असल्याचं दिसून येत आहे. बॉलिवूडमधील महागडा अॅक्शन सिनेमा असून या सिनेमावर जवळपास 300 कोटी रुपये खर्च झाल्याचं बोललं जात आहे. तसेच प्रभास साहो सिनेमातून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा छाप पाडण्यास तयार झाला आहे. मात्र टीझर पाहिल्यानंतर सिनेमाची कथा काय असेल याचा अंदाज लावणं कठीण जात आहे.
साहो सिनेमातील अॅक्शन सीन्सवर खास लक्ष देण्यात आलं आहे. दुबईच्या बुर्ज खलिफामध्येही सिनेमातील काही सीन्स शूट करण्यात आले आहेत. प्रभास आणि श्रद्धा कपूरची केमिस्ट्री टीझरमधून दिसत आहे.
साहोच्या टीझरनंतर आता लोक सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. ट्रेलरमध्ये कदाचित सिनेमाच्या कथेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. प्रभासच्या बाहुबली आणि बाहुबली-2 सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता साहो सिनेमाही बॉक्स ऑफिसवर अशीच कमाल करेल, अशी आशा सिनेमाच्या निर्मात्यांना आहे.
साहो सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, अरुण विजय, महेश मांजरेकर यांच्याही सिनेमात भूमिका आहेत. सिनेमाचा दिग्दर्शन सुजीतने केलं आहे.