(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mithun Chakraborty : अन्नासासाठी वनवन, फूटपाथवर झोपणं अन् त्वचेच्या रंगामुळे अपमान; मिथून चक्रवर्तींनी सांगितलं बॉलिवूड इंडस्ट्रीतील सत्य
Mithun Chakraborty : 'सा रे ग मा प इल चॅम्प्स'च्या मंचावर आयुष्यातील अनेक गोष्टींवर मिथुन चक्रवर्तीने भाष्य केलं आहे.
Mithun Chakraborty : बॉलिवूडचा 'डिस्को डान्सर' म्हणून मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) ओळखले जाते. मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य अशा तिन्ही गोष्टींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. अभिनय आणि नृत्यासह मिथुन अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. आता 'सा रे ग मा प इल चॅम्प्स'च्या मंचावर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
'सा रे ग मा प इल चॅम्प्स'च्या मंचावर मिथुन चक्रवर्ती म्हणाले,"माझ्या आयुष्यात मी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी पाहिलेले दिवस कोणाच्या वाट्याला येऊ नयेत. जगण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागला आहे. पण माझ्या त्वचेच्या रंगामुळे माझा अनेकदा अपमान झाला आहे. अनेकदा मी रिकाम्या पोटी झोपलो आहे. तर कधी झोप येण्यासाठी रडावं लागलं आहे".
मिथुन चक्रवर्ती पुढे म्हणाले,"मी असे दिवस पाहिले आहेत, जेव्हा एक वेळचं जेवण आणि कुठे झोपावं अशा गोष्टींचा विचार करावा लागत असे. कधी-कधी मी फूटपाथवरच झोपलो आहे. माझ्या आयुष्याची कथा, माझा संघर्ष कोणालाही प्रेरणा देणारा नाही. उलट मानसिक त्रास होईल. त्यामुळेच माझ्या आयुष्यावर आधारित बायोपिक व्हावा अशी माझी इच्छा नाही.
'सा रे ग मा प इल चॅम्प्स'च्या मंचावर स्पर्धकांना संदेश देत मिथुन चक्रवर्ती म्हणाले,"इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जो मी केला आणि आता तो तुम्हालाची करावी लागेल. प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे जीवनात कधीही हार मानू नका. स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करा".
View this post on Instagram
मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य या तिन्हींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये 350हून अधिक चित्रपट केले आहेत. मिथुन यांनी 1976 साली 'मृगया' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
संबंधित बातम्या