Mitali Mayekar Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीकडे गुड न्यूज? अभिनेत्रीने एबीपी माझाला दिली माहिती
Mitali Mayekar Siddharth Chandekar : अभिनेत्री मिताली मयेतर आणि सिद्धार्थ चांदेकर आई-बाबा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
![Mitali Mayekar Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीकडे गुड न्यूज? अभिनेत्रीने एबीपी माझाला दिली माहिती Mitali Mayekar Siddharth Chandekar marathi actor siddharth chandekar wife marathi actress Mitali Mayekar getting pregnant post viral on social media know details Mitali Mayekar Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीकडे गुड न्यूज? अभिनेत्रीने एबीपी माझाला दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/01/51126018e2654d366be682327aff0b9c1690874439576254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mitali Mayekar Siddharth Chandekar : मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नबंधनात अडकली आहे. आता त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्री आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. पण अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर आई-बाबा होणार नसल्याचं अभिनेत्रीने एबीपी माझासोबत बोलताना स्पष्ट केलं आहे.
सध्यातरी माझ्याकडे गुड न्यूज नाही : मिताली मयेकर
एबीपी माझाशी बोलताना अभिनेत्री मिताली मयेकर म्हणाली,"सिद्धार्थ आणि मी आई-बाबा होणार असल्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. या बातम्या खोट्या आहेत. सध्यातरी माझ्याकडे गुड न्यूज नाही. मी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण 'Mommys Gettin Hot' हे एक गाणं आहे. ते मला आवडल्यामुळे मी ते कॅप्शन दिलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री मिताली मयेकरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने 'Mommy’s gettin hot!' हे कॅप्शन दिलं. तिच्या या कॅप्शनने नेटकऱ्यांसह चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या या कॅप्शनमुळे त्यांच्या आयुष्यात एका तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. तू प्रेग्नेंट आहेस का? असे प्रश्न चाहत्यांनी अभिनेत्रीला विचारले.
View this post on Instagram
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरतो. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर ते सुखी संसार करताना दिसून आले आहेत. मिताली आणि सिद्धार्थ काही दिवसांपूर्वी पॅरिसला गेले होते.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर 24 जानेवारी 2021 रोजी लग्नबंधनात अडकले. मराठमोळ्या पद्धतीत पुण्याच्या ढेपे वाड्यात त्यांनी लग्न केलं. त्यांच्या शाही लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वी मुंबईत त्यांनी स्वत:चं घर खरेदी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)