Chhatriwali ते Mission Majnu; 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात ओटीटीवर होणार रिलीज
या वीकेंडला कोणता चित्रपट (Movie) आणि वेब सीरिज (Web Series) कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल....
This Week OTT Latest Release: जानेवारी महिन्यातील तिसरा आठड्यात ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. ओटीटीवरील (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळाली. या आठवड्यात काही सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या वीकेंडला कोणता चित्रपट आणि वेब सीरिज कोणती पहायची? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या आठवड्यात रिलीज होणारे चित्रपट आणि वेब सीरिज यांच्याबद्दल....
'मिशन मजनू' (Mission Majnu)
बॉलिवूडचा सुपरस्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदान्ना यांचा 'मिशन मजनू' हा चित्रपटही 20 जानेवारी रोजी थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
झांसी 2 (Jhansi 2)
डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'झांसी सीझन 2' ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. ही बहुप्रतिक्षित वेब सीरिज या आठवड्यात 19 जानेवारीला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
एटीएम (ATM)
'एटीएम' (ATM) या वेब सीरिजची अनेक लोक उत्सुकतेने वाट बघत आहेत. क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर असणारी एटीएम सीरिज तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज 20 जानेवारीला OTT प्लॅटफॉर्म झी-5 वर रिलीज होईल.
छत्तरीवाली (Chhatriwali)
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा 'छत्रीवाली' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात रकुल जीवशास्त्राच्या शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. 20 जानेवारीला रकुलचा छत्तरीवाली चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
फौदा- 4 (Fauada 4)
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 'फौदा' या वेब सीरिजचा चौथा सिझन रिलीज होणार आहे. या सीरिजचा चौथा सीझन नेटफ्लिक्सवर 20 जानेवारीला रिलीज होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: