एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 17 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 17 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक

SS Rajamouli Speech : सध्या सगळीकडे आरआरआर (RRR) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. राजामौली (SS Rajamouli) हे साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आरआरआर चित्रपटाच्या यशानंतर सध्या संपूर्ण देशातूनच भरभरून प्रेम मिळत आहे. नुकताच या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. या दरम्यान एस.एस.राजामौली यांनी मंचावर जे भाषण केलं त्याने संपूर्ण देशाचं मन जिंकलं आहे. 

S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...

S.S. Rajamouli : एसएस राजामौली यांचा 'आरआरआर' (RRR) चित्रपट सध्या जगभरात चर्चेत आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. RRR ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्याचवेळी, नुकतेच या चित्रपटातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्यालाही 80 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स (80th Golden Globe Awards 2023) मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. आता या चित्रपटाने यशाची आणखी एक कहाणी लिहिली आहे. 

राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या सर्व यशादरम्यान 'टायटॅनिक' आणि 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी आरआरआरबद्दल असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे RRR चे दिग्दर्शक राजामौलींचा आनंद गगनात मावत नाहीये.  

Chinmay Mandlekar: चिन्मयच्या 'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज

Chinmay Mandlekar: आपल्या कसदार  लिखाणाने  आणि संयत अभिनयामुळे ओळखला  जाणारा अभिनेता  चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या 'आलंय  माझ्या राशीला' (Aalay Mazya Rashila) असं  म्हणतोय. तो असं  का म्हणतोय? त्याच्या  राशीला  नेमके  कोण आलंय? हा  प्रश्न  तुम्हाला ही पडला असेलच. या  प्रश्नाचे उत्तर  तुम्हाला 10  फेब्रुवारीला  प्रदर्शित होणाऱ्या आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित 'आलंय  माझ्या राशीला' या  मराठी चित्रपटातून मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.

13:57 PM (IST)  •  17 Jan 2023

Gina Lollobrigida: 'जगातील सर्वात सुंदर महिला' जीना लोलोब्रिगिडा यांचे निधन; वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gina Lollobrigida: प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा (Gina Lollobrigida) यांचे निधन झाले आहे. जीना यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्या अभिनेत्री आणि फोटो जर्नलिस्ट  होत्या. जीना लोलोब्रिगिडा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवली.  जीना यांनी वयाच्या   95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  जीना या 50 आणि 60 के दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रिपोर्टनुसार,  काही महिन्यांपूर्वी  जीना यांच्या मांडीचे हाड मोडले होते. मग ते ठीक करण्यासाठी त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, त्यानंतर लगेच जीना चालायला लागल्या होत्या. 

13:05 PM (IST)  •  17 Jan 2023

11:14 AM (IST)  •  17 Jan 2023

Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; 'द वॅक्सीन वॉर'च्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना

Pallavi Joshi: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानंतर आता त्यांचा 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. द वॅक्सीन वॉर चित्रपटाच्या सुरुवात झाली आहे. या चित्रपटात विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. रिपोर्टनुसार, द वॅक्सीन वॉरच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Pallavi Joshi (@pallavijoshiofficial)

08:47 AM (IST)  •  17 Jan 2023

Rohit Shetty: जाळ अन् धूर संगटच; रोहित शेट्टीच्या नव्या वेब सीरिजमध्ये अॅक्शनचा तडका, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, 'काहीही झाले तरी... '

Rohit Shetty: 'गोलमाल (Golmaal), सिंघम (Singham) 'सिम्बा' (Simmba) आणि 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) यांसारख्या सुपरहिट चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या चित्रपटांनं प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. रोहित हा अॅक्शनचा तडका असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करतो. त्याच्या चित्रपटामधील अॅक्शन आणि कॉमेडी सिन्सला प्रेक्षकांची पसंती मिळते. आता लवकरच रोहितची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सीरिजचं नाव 'इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)'  असं आहे. या सीरिजच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ रोहितनं शेअर केला. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

07:30 AM (IST)  •  17 Jan 2023

Waltair Veerayya Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर चिरंजीवींची जादू; जाणून घ्या 'वॉलटेर वीरय्या' चं कलेक्शन

Waltair Veerayya Box Office Collection Day 3:  साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) हे त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकता. वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून चिरंजीवी हे प्रेक्षकांच्या भेटीस येतात. 13 जानेवारी रोजी चिरंजीवी यांचा 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज होताच दोन दिवसांमध्ये 50 कोटींची कमाई केली. हा चित्रपट लवकरच 100 कोटीच्या क्लबमध्ये सामील होईल, असं म्हटलं जात आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं तीन दिवसांचे कलेक्शन...

शुक्रवारचे कलेक्शन-29.6 कोटी
शनिवार कलेक्शन-19.8 कोटी 
रविवारचे कलेक्शन- 20 कोटी
तीन दिवसांचे एकूण कलेक्शन-69.40 कोटी

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget