(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mission Majnu : 'मिशन मजनू'ची तुलना आलिया भट्टच्या 'Raazi'शी; सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला,"एका चांगल्या सिनेमासोबत"
Mission Majnu : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' या सिनेमाची आलिया भट्टच्या बहुचर्चित 'राझी' सिनेमासोबत तुलना होत आहे.
Sidharth Malhotra reacts On Mission Majnu comparison with Raazi : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) 'मिशन मजनू' (Mission Majnu) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सिनेमाची आलिया भट्टच्या (Alia Bhatt) बहुचर्चित 'राझी' (Raazi) या सिनेमासोबत तुलना होत आहे.
'मिशन मजनू' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमात सिद्धार्थ एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे. 'मिशन मजनू' आणि 'राझी' या दोन्ही सिनेमांना 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी आहे. तसेच या सिनेमात आलियाने देखील गुप्तहेराची भूमिका साकारली आहे.
'मिशन मजनू' आणि 'राझी' या सिनेमांच्या तुलनेवर भाष्य करत सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) म्हणाला,"मिशन मजनू'ची 'राझी' सिनेमासोबत तुलना होणं हे अयोग्य नाही. 'राझी' एक चांगला सिनेमा आहे. 1971 चं भारत-पाकिस्तान युद्ध हा या सिनेमाचा समान धागा आहे. पण तरीही हे दोन्ही सिनेमे पूर्णपणे वेगळे आहेत. एका चांगल्या सिनेमासोबत तुलना होणं ही चांगली गोष्ट आहे".
सिद्धार्थ पुढे म्हणाला,"मी नुकताच 'शेरशाह' हा सिनेमा पाहिला असून हा सिनेमादेखील भारत आणि पाकिस्तानावर आधारित आहे. या सिनेमातदेखील दोन देशांचं युद्ध दाखवण्यात आलं आहे. हा एक प्रकारचा माहितीपट आहे. 'मिशन मजनू' हा सिनेमादेखील माहितीपट म्हणून पाहावा.
'मिशन मजनू' कुठे पाहू शकता? (Where Can Watch 'Mission Majnu')
सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू' (Mission Majnu) या सिनेमाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. शंतनू बागचीने (Shantanu Baagchi) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात सिद्धार्थसह रश्मिका मंदान्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
'मिशन मजनू' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आयएमडीबी (IMDB) रेटिंगमध्ये या सिनेमा 9.4 रेटिंग मिळाले आहे. सिनेमातील सिद्धार्थच्या अभिनयांचं प्रचंड कौतुक होत आहे. या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झाला तर त्या सिनेमाला विरोध होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी त्या सिनेमाला विरोध दर्शवत आहेत. एकीकडे सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्माते लाखो रुपये खर्च करत आहेत. तर दुसरीकडे सिनेमावर टीका केली जात आहे. याचा निर्मात्यांना मोठा फटका बसत आहे.
संबंधित बातम्या