Sienna Weir Passes Away : 'मिस युनिव्हर्स' सिएनाचं 23 व्या वर्षी निधन; घोडेस्वारी करताना झालेला अपघात
Sienna Weir : मॉडेल सिएना वीरचं वयाच्या 23 व्या वर्षी निधन झालं आहे.
Sienna Weir Passes Away : 'मिस युनिव्हर्स 2022'मध्ये (Miss Universe 2022) आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचं (Sienna Weir) निधन झालं आहे. वयाच्या 23 व्या वर्षी मॉडेलने अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) घोडेस्वारी करताना (Horse Riding) अभिनेत्रीचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
मीडिया रिपोर्टनुसार, 2 एप्रिलला सिएना ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात घोडेस्वारी करत होती. पण अचानक ती घोड्यावरुन खाली पडली. त्यानंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही आठवड्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. तिला डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते.
View this post on Instagram
प्रयोगशील सिएना...
'मिस युनिव्हर्स 2022' या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं आहे. आता पुढीत शिक्षणासाठी युकेला (United Kingdom) जाण्याचा मॉडेल विचार करत होती. सिएना ही खूप प्रयोगशील होती. ती मॉडेलिंग क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असे.
सिएनाच्या मृत्यूनंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफर क्रिस ड्वायरने शोक व्यक्त करत लिहिलं आहे की,"जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती... अल्पावधीतच यश मिळवलसं पण आता सर्वत्र अंधार आहे.". आमच्यासाठी तू कायम जिवंत असशील, तुझी आम्हाला आठवण येईल, अशा कमेंट्स करत चाहते शोक व्यक्त करत आहेत.
Tras horrible accidente, muere a los 23 años la modelo Sienna Weir que fue finalista en Miss Universo via @El_Plural https://t.co/0bUL6LA4aR
— Hector Veyssiere (@Hectorveyssiere) May 6, 2023
सिएनाबद्दल जाणून घ्या.. (Who is Sienna Weir)
सिएना एक मॉडेल आहे. मॉडेलिंग क्षेत्रात तिने उत्तम कामगिरी केली आहे. आपल्या सौंदर्याने तिने चाहत्यांना भूरळ पाडली आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉडेल्समध्ये सिएनाची गणना होते. खूप लांबचा पल्ला गाठण्याची सिएनाची इच्छा होती. या प्रवासाला तिने सुरुवातदेखील केली होती. सिएना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. जगभरातील अनेक फॅशन शोमध्ये सिएना सहभागी झाली आहे.
संबंधित बातम्या