एक्स्प्लोर
अल्ट्रामॅन मिलिंद सोमण, 517 किमीची स्पर्धा अनवाणी पूर्ण
ओरलँडो/मुंबई : एव्हरग्रीन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने गेल्या वर्षी आयर्नमॅन हा किताब पटकावून वय म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ असतो, या वाक्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. आता एक पाऊल पुढे जात मिलिंदने आपण 'अल्ट्रामॅन' असल्याचं सिद्ध केलं आहे.
सर्वसामान्यांना 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावतानाही नाकी नऊ येतात. मात्र मिलिंद सोमणने वयाच्याच नाही, तर किलोमीटरच्या आकड्यांवरही मात केली आहे. 51 व्या वर्षी अल्ट्रामॅरेथॉनमध्ये त्याने केलेली कामगिरी निश्चित वाखाणण्याजोगी आहे.
काय असते अल्ट्रामॅरेथॉन?
पहिल्या दिवशी दहा किलोमीटर स्विमिंग आणि 142 किलोमीटर सायकलिंग, दुसऱ्या दिवशी 276 किमी सायकलिंग आणि तिसऱ्या दिवशी तब्बल 84 किमी धावणे. विशेष म्हणजे मिलिंदने एकट्याने ही शर्यत अनवाणी पूर्ण केली आहे. 517.5 किमीची शक्यप्राय वाटणारी ही शर्यत मिलिंदसह पाच भारतीयांनी साध्य केली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेटमधल्या ओरलँडोमध्ये ही स्पर्धा पार पडली
मिलिंद सोमणसोबत अभिषेक मिश्रा, कौस्तुभ राडकर, पृथ्वीराज पाटील आणि मनमढ रेब्बा यांनी अल्ट्रामॅरेथॉन यशस्वीरित्या पार केली आहे. मिलिंदनेच फेसबुकवर त्याच्या कामगिरीची माहिती चाहत्यांना दिली आहे.
सुपरमॉडेल मिलिंद सोमण आता 'आयर्नमॅन', सर्वात अवघड 'ट्रायथलॉन'चं जेतेपद
झुरिचमधील सर्वात कठीण मानली जाणारी ट्रायथलॉन मिलिंद सोमणने गेल्या वर्षी यशस्वीपणे पार केली होती. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये 7 भारतीयांसह देशविदेशातील दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या स्पर्धांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेलं असतं. वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180.2 किलोमीटर सायकलिंग, 42.2 किलोमीटर धावण्याचा समावेश होता. 'आयर्नमॅन' हा किताब जिंकण्यासाठी स्पर्धकांना ही ट्रायथलॉन 16 तासांमध्ये पूर्ण करणं गरजेचं असतं. मिलिंदने झुरिचच्या ट्रायथलॉनमध्ये पहिल्यांदाच सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे 16 तासांत पूर्ण करण्यास अवघड मानली जाणारी ही स्पर्धा त्याने 15 तास 19 मिनिटांतच पूर्ण केली होती. आयर्नमॅनचा किताब 12 वेळा जिंकणाऱ्या पुण्याच्या कौस्तुभ राडकर यांनी अल्ट्रामॅरेथॉनमध्येही मिलिंद यांची साथ दिली.आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या मातोश्रींची 76 व्या वर्षी दौड
मिलिंद यांच्या 76 वर्षीय मातोश्री उषा सोमण यासुद्धा गेल्या वर्षी दोन आठवडे चाललेल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या. अहमदाबाद ते मुंबई अशा मॅरेथॉनमध्ये मिलिंद यांच्या सोबतीने त्याही सामील झाल्या. विशेष म्हणजे उषा सोमण यांनी अनवाणी ही मॅरेथॉन पूर्ण केली, तेही साडी नेसून. मिलिंद यांच्या आई शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. काही वर्षांपूर्वीही उषा सोमण यांनी 100 किमी अंतर 48 तासात पार केलं होतं. मुंबई ऑक्सफाम ट्रेलवॉकरमध्ये त्यांनी कोणतीही वैद्यकीय मदत न घेता हे अंतर कापलं. सोमण मायलेकांचा हा उत्साह तरुणांनाही लाजवणारा असून त्यांची जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement