एक्स्प्लोर
मायली सायरस गर्लफ्रेण्डसोबत लिव्ह-इनमध्ये?
मायली आणि लियाम यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यापासून ती कायम कॅटलिनसोबत दिसत होती.
लॉस एंजलिस : पतीपासून वेगळं झाल्यानंतर अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मायली सायरस सध्या गर्लफ्रेण्ड कॅटलिन कार्टरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात आहे. मायलीने पती लियाम हेम्सवर्थपासून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. कॅटलिन कार्टरसोबतचं आपलं नातं खुलेपणाने स्वीकारलं नसलं तरी दोघी कायम सोबत दिसतात. त्यांच्या कथित संबंधांमुळेच लियाम आणि मायलीचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे.
"मी बायसेक्शुअल असून महिलांकडेही आकर्षित होते," असं मायलीने आधीच स्वीकार केलं आहे.
मायली आणि लियाम यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आल्यापासून ती कायम कॅटलिनसोबत दिसत होती. तर मागील आठवड्यापासूनच ती आणि कॅटलिन लॉस एंजलिसमध्ये हिडन हिल परिसरात एकत्र राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी मायली इटलीमध्ये सुट्टीसाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत कॅटलिन कार्टर होती. इतकंच नाही तर लियामसोबत वेगळं झाल्यानंतर मायली आणि कॅटलिनचा किस करतानाचा फोटोही समोर आला होता. त्यावेळी दोघी लंच डेटवर गेल्या होत्या.
दरम्यान, मायली 2009 पासूनच लियाम हेम्सवर्थसोबत डेट करत होती. यादरम्यान दोघांचं अनेक वेळा ब्रेकअपही झालं होतं. मात्र नंतर दोघांनी लग्न केलं. परंतु हे लग्न केवळ आठ महिनेच टिकलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement