एक्स्प्लोर
‘पिफ’मध्ये ‘म्होरक्या’ची बाजी, तीन पुरस्कारांवर मोहोर
मराठी चित्रपट तिकीट खिडकीवर उत्तम कामगिरी करत असल्याचे सांगत ऋषी कपूर यांनी ‘सैराट’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला.

पुणे : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये (पिफ) अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या चित्रपटाने मोहर उमटवली. ‘पिफ’मध्ये ‘म्होरक्या’ने तीन पुरस्कार पटकावले. यानंतर ‘म्होरक्या’च्या टीमने आनंद व्यक्त केला.
मराठी विभागात सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरस्कार गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पिंपळ’ या चित्रपटाला देण्यात आला. ‘पिंपळ’साठी गजेंद्र अहिरे यांना सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर, ‘म्होरक्या’ चित्रपटातील भूमिकेसाठी रमन देवकर याला सर्वोत्तम अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. याचसोबत, ‘द फोर्च्युनेट वन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री मिताली जगताप हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
'म्होरक्या' चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार रमन देवकरला मिळाला, तर सिनेमॅटोग्राफीसाठी गिरीश जांभळीकर यांना सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळाला. तसेच, ‘म्होरक्या’ला स्पेशल ज्युरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
पुण्यात सोळाव्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ) पार पडलं. यावेळी आंतरराष्ट्रीय विभाग आणि मराठी चित्रपट विभागातील विजेत्या चित्रपटांचे नावे जाहीर करण्यात आली आणि संबंधितांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ‘फ्री अँड ईजी’ या चित्रपटाला देण्यात आला.
VIDEO : 'म्होरक्या'च्या टीमशी बातचीत
यावेळी ‘पिफ फोरम’मध्ये ‘काँट्रीब्युशन ऑफ अॅन अॅक्टर इन सिनेमा’या विषयावर ऋषी कपूर यांच्याशी गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कपूर यांची मुलाखत घेतली. चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही, असं मत ऋषी कपूर यांनी व्यक्त केलं. त्याचसोबत राज कपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्या आठवणीही जागवल्या.
“कपूर घराण्यात जन्माला आल्यामुळे तुम्हाला एक विशेष ओळख मिळते, पण त्याच वेळी तुमच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आणि जबाबदारी असते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, असे म्हटले जाते. परंतु माझ्या मते ते खरे नाही. रणबीर कपूर, करीना कपूर यांचे पहिले सिनेमे तिकीट खिडकीवर चालले नाहीत. पण तुमच्यात अभिनयाचे गुण असतील तर तुम्ही यशस्वी होताच. कोणताही अभिनेता प्रेक्षकांच्या माथी मारता येत नाही. अभिनेते आणि राजकारणी हे लोक स्वत:च निवडतात,”, असे अभिनेते ऋषी कपूर यांनी सांगितले.
आज मराठी चित्रपट तिकीट खिडकीवर उत्तम कामगिरी करत असल्याचे सांगत ऋषी कपूर यांनी ‘सैराट’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. “मराठीतील नवीन लेखक आव्हाने स्वीकारुन चांगले चित्रपट लिहीत आहेत. अनेक चांगले अभिनेते मराठीत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक व्यक्त केले.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश सिप्पी, निर्माते व 'प्रसाद स्टुडिओज्'चे प्रमुख रमेश प्रसाद आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'त (पिफ) 'पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड' हा विशेष पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले, तर प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना 'एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
