Masterchef India Winner : ज्यूस सेंटर चालवणारा 24 वर्षीय मोहम्मद आशिक ठरला 'मास्टरशेफ इंडिया 8'चा विजेता; ट्रॉफीसह मिळाले लाखो रुपये
Mohammed Ashiq : मोहम्मद आशिक 'मास्टरशेफ इंडिया 8'चा (Masterchef India 8) विजेता ठरला आहे. सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे.
Masterchef India 8 Finale Mohammed Ashiq Winner : 'मास्टरशेफ इंडिया 8' (Masterchef India 8) या लोकप्रिय कार्यक्रमाचा नुकताच ग्रँड फिनाले फार पडला आहे. विकास खन्ना, रणवीर बरार आणि पुजा ढिंगरा यांनी या पर्वाचं परिक्षण केलं आहे. 16 ऑक्टोबरला सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम सुरू झाला होता. या पर्वात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांनी आपल्या कुकिंग शैलीने जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. 24 वर्षीय मोहम्मद आशिकने (Mohammed Ashiq) 'मास्टरशेफ इंडिया 8'च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मोहम्मद हा कर्नाटकातील मैंगलोर परिसरात राहणारा आहे.
'मास्टरशेफ इंडिया' जिंकलेल्या मोहम्मदला किती रुपये मिळाले? (Masterchef India 8 Winner Mohammed Ashiq Prize Money)
मोहम्मद आशिकला 'मास्टरशेफ इंडिया' या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. पण यापर्वात सहभागी होत विजेतेपदावर त्याने नाव कोरलं आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या मोहम्मदला मोठा संघर्ष करावा लागला आहे. कर्नाटकातील मैंलोरमध्ये मोहम्मदचं एक ज्युस सेंटर आहे. 'मास्टरशेफ इंडिया 8'चा विजेता ठरलेल्या मोहम्मदला 25 लाख रुपये आणि ट्रॉफी मिळाली आहे. मोहम्मदसह टॉप चार स्पर्धकांमध्ये नाम्बी मारक, डॉ. रुखसार सईद आणि सूरज थापा यांचाही समावेश होता.
View this post on Instagram
'मास्टरशेफ इंडिया 8'ची ट्रॉफी माझ्यासाठी स्वप्नवत : मोहम्मद आशिक
'मास्टरशेफ इंडिया 8'चं विजेतेपद पटकावल्यानंतर मोहम्मद आशिक म्हणाला,"मास्टशेफ इंडिया'च्या प्रवासाचा मी खूप आभारी आहे. एलिमिनेशन ते ट्रॉफीपर्यंतच्या या प्रवासात अनेक गोष्टी मला शिकता आल्या आहेत. 'मास्टरशेफ इंडिया 8'ची ट्रॉफी माझ्यासाठी स्वप्नवत आहे. हे जिंकण माझं एकट्याचं नसून संघर्ष करणाऱ्या प्रत्येकाचं आहे. शेफ विकास, रणवीर आणि पूजासह सर्व परिक्षणकांचे मी आभार मानतो. प्रत्येकदिवशी त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे.
मोहम्मद आशिक 'मास्टरशेफ इंडिया'मध्ये सहभागी होण्याचे प्रयत्न गेल्यावर्षीपासून करत होता. पण गेल्या पर्वात तो क्वालीफाय झाला नाही. पण सब्र का फल मीठा होता है हे मोहम्मदच्या बाबतीत खरं ठरलं. मोहम्मद 'मास्टरशेफ इंडिया 8'मध्ये क्वालीफाय न होता तो या पर्वाचा विजेता ठरला आहे. मोहम्मदने 'मास्टरशेफ इंडिया'च्या ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचला आहे. 'मास्टरशेफ इंडिया 8' हा कार्यक्रम 16 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या