Masaba Gupta Wedding : लेकीच्या लग्नात विवियन रिचर्ड्सची हजेरी; नीना गुप्ता फोटो शेअर करत म्हणाल्या...
Masaba Gupta Wedding Photos : मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे.

Neena Gupta Daughter Masaba Gupta Wedding Photos : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra) लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. या फोटोने मात्र सर्वांचच लक्ष वेधलं आहे.
मसाबा ही नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची मुलगी आहे. विवियनसोबत रिलेशनमध्ये असतानाच नीना प्रेग्नंट राहिल्या होत्या. त्यावेळी लग्न न करताच त्यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर नीना गुप्ता विवेक मेहरासोबत लग्नबंधनात अडकल्या.
नीना गुप्ता यांनी मसाबाच्या दुसऱ्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत नीना गुप्ता, त्यांचे पती, विवियन रिचर्ड्स, मसाबा, सत्यदीप, सत्यदीपची आई आणि बहीण दिसत आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"मुलगी, नवीन मुलगा, मुलाची आई, मुलाची बहीण, मुलाचे वडील, मी आणि माझा नवरा".
View this post on Instagram
मसाबाच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नीना गुप्ता यांनी लेकीसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे,"आज लेक लग्नबंधनात अडकली आहे. खूप आनंद होत आहे". नीना गुप्ता यांच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मसाबा गुप्ता आणि सत्यदीप मिश्रा दोघांचही हे दुसरं लग्न आहे. 'मसाबा मसाबा' (Masaba Masaba) या वेबसीरिजदरम्यान दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर 27 जानेवारी 2023 रोजी मसाबा आणि सत्यदीप लग्नबंधनात अडकले आहेत.
मसाबा एक अभिनेत्री असण्यासोबत फॅशन डिझायनरदेखील आहे. तिचा लग्नसोहळ्यातील लूक खूपच खास होता. तिने लग्नात गुलाही रंगाचा लहेंगा परिधान केला होता. त्यावरील सोन्याच्या दागिन्यांनी तिच्या लूकला चार चांद लावले आहेत.
मसाबा गुप्ता 2015 साली सिने-निर्माता मधु मंटेनासोबत लग्नबंधनात अडकली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2019 साली ते विभक्त झाले. तर दुसरीकडे सत्यदीप मिश्रा 2009 साली अभिनेत्री आदिती राव हौदरीसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण 2013 साली त्यांचा घटस्फोट झाला.
संबंधित बातम्या























