एक्स्प्लोर

Funral : मार्टिन करतोय 'फनरल'चं प्रमोशन; 10 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Funral : 'फनरल' हा सिनेमा 10 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Funral : 'जगू आनंदे, निघू आनंदे' या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा 'फनरल' (Funral) हा मराठी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून देश-विदेशांतील सिनेमहोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवत आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा 'फनरल' चित्रपटरूपात मांडली असून, सध्या हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळं मुंबईपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही पशू-पक्षी अपवित्र मानले आहेत. या यादीत सर्वप्रथम येतो तो कावळा... कावळा आपल्या जवळ जरी आला तरी आपण त्याला हकलतो, त्याचा तिरस्कार करतो. असा हा अपवित्र असलेला कावळा काही वेळी मात्र पवित्र बनतो. मानवाच्या निधनानंतर दशक्रिया विधीवेळी कावळा पिंडाला शिवणं हे शुभ मानलं जातं. त्यावेळी कावळ्याच्या रूपात आपल्याला आपले पूर्वज दिसू लागतात. पिंडाला कावळा शिवला नाही, तर मृत्यू झालेल्या व्यक्तीची कोणतीतरी इच्छा अधूरी राहिल्याचं मानलं जातं. कावळा पिंडाला शिवण्यासाठी चातकासारखे आकाशाकडे डोळे लावून त्याची वाट पाहिली जाते आणि अखेर काव... काव... करत जेव्हा कावळा येऊन पिंडाला शिवतो तेव्हा दशक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतो. धर्मशास्त्रात अशुभ मानल्या जाणाऱ्या याच कावळ्याला सोबत घेऊन 'फनरल' चित्रपटाचं प्रमोशन करण्याची अनोखी शक्कल चित्रपटाच्या निर्मात्यांनी लढवली आहे.

‘मार्टिन क्रो’ आता प्रेक्षकांच्याही भेटीगाठी घेतोय

'फनरल' सिनेमातही एक कावळा आहे, जो नायक साकारलेल्या आरोह वेलणकरला नेहमी भेटतो. आरोहही त्याला काही ना काही खायला देतो. आरोहनं चित्रपटात या कावळ्याचं नाव ‘मार्टिन’ ठेवलं आहे. चित्रपटातील ‘मार्टिन क्रो’ आता प्रेक्षकांच्याही भेटीगाठी घेत आहे. 'फनरल'च्या प्रमोशनसाठी एक भला मोठा कावळा बनवण्यात आला आहे. हा कावळा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही चर्चेचा विषय ठरला होता आणि इफ्फीमध्येही रेड कार्पेटवर चालूनही त्यांनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हाच मार्टिन सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील लोकांना भेटतोय. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वचजण या कावळ्याला पाहून खुश होत असून, त्याच्या प्रेमात पडले आहेत. कावळ्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. 'फनरल'च्या निमित्तानं एक वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे.

माणूस आयुष्यभर खूप चिंता करत असतो. आयुष्य संपायला येतं तेव्हा बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्याचं जाणवतं. याच सर्व गोष्टींवर तिरकस शैलीत भाष्य करताना, कोणाच्याही भावना न दुखावता विनोदी पद्धतीनं वास्तववादी घटनांचं सादरीकरण 'फनरल' मध्ये करण्यात आलं आहे. यातील संवाद खूप अर्थपूर्ण असून, घराघरातील कथा सांगणारे आहेत. आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे आदी कलाकार या चित्रपटात आहेत. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन 'बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट' प्रस्तुत 'फनरल' सिनेमा 10 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

संबंधित बातम्या

Funral : 'फनरल'चा डंका सातासमुद्रापार, 10 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्सSupriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहोChhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजीABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.