Marathi Movies : माधुरीचा 'पंचक' ते नाना पाटेकरांचा 'ओले आले'; नव्या वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची नांदी
Marathi Movies : नव्या वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची नांदी पाहायला मिळणार आहे. या सिनेमांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे.
Marathi Movies Release January First Friday : मराठी मनोरंजनसृष्टीसाठी (Marathi Movies) 2023 हे वर्ष खूप खास राहिलं असून नव्या वर्षातही अनेक धमाकेदार सिनेमे रिलीज होणार आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांची नांदी पाहायला मिळणार आहे. या सिनेमांची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे. माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) 'पंचक' (Panchak) या सिनेमापासून नाना पाटेकरांच्या (Nana Patekar) 'ओले आले' (Ole Ale) या सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
पंचक (Panchak)
कधी रिलीज होणार? 5 जानेवारी 2024
डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार, हे बघताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार आहे.
ओले आले (Ole Ale)
कधी रिलीज होणार? 5 डिसेंबर 2024
सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर (Nana Patekar) एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री प्रेक्षकांना या सिनेमाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी 'ओले आले' या मराठी सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि विनोदाचे चौकार आणि षट्कार मारायला नाना आणि मकरंद अनासपुरे सज्ज आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची ही मजेशीर जोडगोळी 'ओले आले' मधून आपल्याला नक्कीच मनसोक्त हसवेल यात काही शंका नाही पण हा चित्रपट आपल्याला जगण्याचा एक अनोखा कानमंत्र सुद्धा देईल हे नक्की.
सत्यशोधक (Satyashodhak)
कधी रिलीज होणार? 5 डिसेंबर 2024
समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य ‘सत्यशोधक’ हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी या सिनेमाला गौरवण्यात आले आहे. संदीप कुलकर्णीने या सिनेमात महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. दीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या