Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरसाठी यंदाचा गणेशोत्सव स्पेशल; 'गणराज गजानन'च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण


Amruta Khanvilkar On Kalavantancha Ganesh : आज घरोघरी गणपती बाप्पाचं (Ganesh Chaturthi 2023) जल्लोषात आगमन झालं आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही बाप्पाचं दणक्यात आगमन केलं आहे. अभिनेत्री-नृत्यांगणा अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि बाप्पाचं नातं हे गुरू-शिष्याचं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते शो का बंद करतोय?'; नेटकऱ्याचा प्रश्न; अवधूत गुप्ते म्हणाला, 'लवकरच...'


Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमानं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हजेरी लावली. खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम बंद का केला? असा प्रश्न नुकताच एका नेटकऱ्यानं अवधूत गुप्तेला (Avadhoot Gupte)  विचारला. अवधूत गुप्तेनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Kranti Redkar : "लहान मुलांची आणि गणूची मैत्री..."; क्रांती रेडकरची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, "खूपच क्युट"


Kranti Redkar: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच क्रांतीनं एक खास व्हिडीओ शेअर केल्या आहे. तिनं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Subodh Bhave : सुबोध भावेच्या घरी यंदा "चांद्रयान 3" चा देखावा; अभिनेत्यानं शेअर केले खास फोटो


Subodh Bhave: आज अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचं (Ganesh Chaturthi 2023) जल्लोषात आगमन झालं आहे. अभिनेता सुबोध भावेच्या  (Subodh Bhave) बाप्पाचं आगमन झालं आहे. सुबोध भावेनं नुकतेच त्याच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सुबोधनं यंदा त्याच्या घरी  "चांद्रयान 3" (Chandrayaan 3) चा देखावा केला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा


Lata Mangeshkar: गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय.  मात्र लतादीदी सांगलीच्या असल्याने त्यांच्या नावाचे सांगलीत आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभे करावे. त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन (Vijay Singh Patwardhan) यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा