Amruta Khanvilkar On Kalavantancha Ganesh : आज घरोघरी गणपती बाप्पाचं (Ganesh Chaturthi 2023) जल्लोषात आगमन झालं आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही बाप्पाचं दणक्यात आगमन केलं आहे. अभिनेत्री-नृत्यांगणा अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि बाप्पाचं नातं हे गुरू-शिष्याचं आहे.
एबीपी माझाशी बाप्पाबद्दल बोलताना अमृता खानविलकर म्हणाली,"गणपती बाप्पा (Ganapati Bappa) हा माझा गुरू आहे. आमचं गुरू-शिष्याचं नातं आहे. गणपती बाप्पा हा कलेचं दैवत आहे. आज कलाक्षेत्रात मी जे काम करत आहे ते त्याच्यामुळेच आहे. कारण मी कोणत्याही नृत्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. गणेशोत्सवात नेहमीच मी नृत्य करत असते".
यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप स्पेशल : अमृता खानविलकर
अमृता खानविलकरसाठी यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) खूप स्पेशल आहे. त्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली,"यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. बाप्पासाठी मी 'गणराज गजानन' या गाण्याचं सादरीकरण आणि निर्मिती केली आहे. बाप्पाच्या चरणी हा माझ्याकडून नैवेद्य आहे. बाप्पाने माझ्यात कला रुजवली आहे. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांपर्यंत कला पोहोचवण्याचा मी कायमच प्रत्यन करेल. बाप्पाच्या कृपेने मी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. मला असं वाटतं की, जेव्हा आपण बाप्पासाठी काहीतरी करत असतो तेव्हा तोच आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडवत असतो. बाप्पामुळे हे गाणं घडलं आहे. लोकांनाही हे गाणं खूप आवडत आहे. अगदी लहान-लहान मुलं त्याचे रिल्स बनवत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची गुरूदक्षिणा मला मिळाली आहे".
बाप्पाबद्दल बोलताना अमृता म्हणाली,"गणराज गजानन' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान प्रचंड पाऊस पडत होता. एका दिवसातच आम्हाला या गाण्याचं शूटिंग करायचं होतं. शूटिंगच्या एक दिवस आधी रात्री रेकी करण्यासाठी मी लोकेशनवर गेले होते. मुसळधार पाऊस पाहून मी बाप्पाला म्हटलं की, जर पाऊस पडला तर मला शूट करता येणार नाही आणि शूट करता आलं नाही तर ही संपूर्ण टीम पुन्हा एकदा जमू शकणार नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही गाणं शूट करत होतो त्यादिवशी प्रचंड ऊन होतं. त्या उन्हात मी करपले होते. त्यादिवशी पाण्याचा एकही थेंब पडला नाही आणि सुरक्षित शूटिंग पूर्ण झालं. मला असं वाटतं की ही बाप्पाची कृपा होती".
अमृता खानविलकर गणेशोत्सादरम्यान उकडीच्या मोदकांवर मारते ताव
अमृता खानविलकर पुढे म्हणाली," मी आणि बहिण लहान असल्यापासून पुण्यात आम्ही देखावे पाहायला जायचो. हे जुने दिवस पुन्हा कधीही येणार नाहीत. गणेशोत्सवातील हे दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. गणेशोत्सवादरम्यान मी डाएट करत नाही. उकडीच्या मोदकांवर ताव मारते. यंदाच्या गणेशोत्सात मी कामात खूप व्यस्त आहे".
संबंधित बातम्या