Subodh Bhave: आज अनेकांच्या घरी गणपती बाप्पाचं (Ganesh Chaturthi 2023) जल्लोषात आगमन झालं आहे. अभिनेता सुबोध भावेच्या  (Subodh Bhave) बाप्पाचं आगमन झालं आहे. सुबोध भावेनं नुकतेच त्याच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सुबोधनं यंदा त्याच्या घरी  "चांद्रयान 3" (Chandrayaan 3) चा देखावा केला आहे.

सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोमध्ये 'शिवशक्ती' पॉईंट (Shiv Shakti Point) आणि LVM3 रॉकेट दिसत आहे. तसेच देखाव्यामध्ये चंद्र देखील दिसत आहे. सुबोधनं देखाव्याचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, गणपती बाप्पा मोरया. यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा "चांद्रयान 3". श्री गणेश आपल्या सर्वाना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना.मोरया'

सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सुंदर आहे देखावा दादा.. गणपती बाप्पा मोरया' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'वाह!! खूपच सुंदर, समर्पक देखावा! गणपती बाप्पा मोरया!! तुम्हाला सर्वांना श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!!'

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुबोध भावेनं सांगितलं होतं,"गणपती बाप्पाचं आणि माझं मैत्रीचं नातं आहे. गेल्या 100 वर्षांपासून आमच्या घरी बाप्पा येत आहे". 

'बाप्पा माझ्या पाठीशी नाही असा एकही प्रसंग नाही. जेव्हा तुम्ही अडचणीत असता, अस्वस्थ होता, जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तेव्हा तुम्ही मनापासून बाप्पाचं नाव घेता आणि तुम्हाला मार्गही सापडतो". असंही सुबोध भावेनं मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

सुबोधचे चित्रपट

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर,  लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमधील सुबोधच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच तुला पाहते रे या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. काही महिन्यांपूर्वी सुबोधचा फुलराणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  आता सुबोधच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. सुबोध त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Subodh Bhave : कधी काही चूक झाली तर त्याच्याकडे जातो अन्...; सुबोध भावे आणि बाप्पाचं नातं आहे खास