Kranti Redkar: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ही सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच क्रांतीनं एक खास व्हिडीओ शेअर केल्या आहे. तिनं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


क्रांती रेडकरनं नुकताच एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या मुली हॅप्पी बर्थ-डे टू यू हे गाणं गाताना दिसत आहे. या व्हिडीओला क्रांतीनं कॅप्शन दिलं, "आमच्‍या घरी गणपती बसत नाही.पण लहान मुलांची आणि गणूची मैत्री कही औरच असते. ढोलकीच्या शूट दरम्यान ही मूर्ती माला नेहा पाटीलने गिफ्ट म्हणून दिली होती. आणि छबिल आणि गोदोचा तो खास मित्र झाला, तो त्यांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक झाला. गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वाना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा."


क्रांती रेडकरनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे."खूपच क्युट"  अशी कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केली आहे.






ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामधील  नेहा पाटीलने काही दिवसांपूर्वी क्रांतीला गणपतीची मूर्ती गिफ्ट म्हणून दिली होती. नेहा पाटीलने या गणपतीच्या मूर्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,  'गणपती बाप्पाचे माहेरघर असलेल्या पेण वरून आणली gampu ची मूर्ती' 






करार, जत्रा, पिपाणी, मर्डर मिस्ट्री या चित्रपटांमध्ये क्रांतीनं काम केलं. क्रांतीच्या 'कोंबडी पळाली' या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता क्रांती ही ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या कार्यक्रमाचे ती परीक्षण करते. क्रांती ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 551K फॉलोवर्स आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Kranti Redkar: क्रांती रेडकरची खास पोस्ट; समीर वानखेडेंसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, 'प्रेम हे...'